![]()
जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, अधीक्षक, लिपीक, शिपाई आणि ग्रंथपाल यांना तब्बल दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. एका सेवानिवृत्त प्रबंधकाला त्यांच्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवून देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना एसीबीने या पाचही जणांवर कारवाईचा बडगा उगारला असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज महाविद्यालयातच सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताच प्राचार्य राहुल हिवराळे व अधीक्षक बबन राठोड यांच्यासह पाचही जणांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे जालना शहरात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, अधीक्षक, लिपीक, शिपाई आणि ग्रंथपाल यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. अवघ्या 10 दिवसांच्या अंतराने शहरात लाचखोरीची ही दुसरी मोठी घटना उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी, केवळ दहा दिवसांआधी एसीबीच्या पथकाने राज्य कर विभागातील महिला अधिकारी सुवर्णा लोहिया आणि खासगी कर सल्लागार अक्षय लोढा यांना 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच रंगेहात पकडले होते. एका इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्याचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ अनब्लॉक करून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि तडजोडीअंती 60 हजार रुपये स्वीकारताना त्यांच्यावर ही कारवाई झाली होती. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. अवघ्या 10 दिवसांच्या फरकाने जालना शहरात लाचखोरीच्या या दोन मोठ्या कारवाया झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Source link
जालन्यात दीड लाखांची लाच स्वीकारताना प्राचार्यांना अटक:समाजकार्य महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार, 'एसीबी'ची धडक कारवाई
