Headlines

Home Buying Tips; एक घर असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरे घर घेताय? तेही कर्ज काढून? गुंतवणूक करण्यापूर्वी नक्की तपासा 8 महत्त्वाच्या गोष्टी


Real Estate News: आपले राहते घर घेतल्यानंतर बरेच लोक गुंतवणूक म्हणून दुसरे घर घेण्याचा विचार करतात. साधारणतः रिअल इस्टेट किंवा मालमत्तेच्या किमती कालांतराने वाढतात असं मानलं जातं पण, त्यामुळे दुसरे घर भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकते. मात्र, केवळ याच विचारावर गुंतवणूक करणे शहाणपणा नाही.

भाडे, एकूण खर्च, गृहकर्ज, कर आणि भविष्यातील वाढ यांचा ताळमेळ बसल्यावरच दुसरे घर चांगली गुंतवणूक तेव्हाच ठरेल. त्यामुळे कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल हिशोब केला पाहिजे तसेच, दुसरे घर खरेदी करण्यापूर्वी विचारात घ्यावयाच्या घटकांबद्दल जाणून घेऊया.

Maharashtra TimesIndian Taxpayer Viral Post : 26,600 रुपयांच्या डिव्हिडंटवर 26,300 रुपये टॅक्स-व्याज, महिला म्हणते- ‘आता 300 रुपयांचं काय करू?’

भाड्याच्या उत्पन्नाचा विचार करा

दुसरे घर घेताना बहुतेकदा सर्वात मोठा फायदा अनेकदा भाड्याचे उत्पन्न मानला जातो. पण, यासाठी मासिक भाडे एकमेव आधार असू नये. उदाहणार्थ समजा तुम्ही एक कोटींचा फ्लॅट किंवा घर घेतले आणि दर महिन्याला 25000 रुपये घरभाडे मिळाले तर, वार्षिक भाडे सुमारे 3 लाख मिळतील. म्हणजे तुमचे एकूण भाडे उत्पन्न सुमारे 3% असेल ज्यामध्ये मेंटेनन्स, राहण्याचा खर्च, कर आणि इतर खर्चांचा समावेश नाही. त्यामुळे, प्रत्यक्ष परतावा याहूनही कमी असू शकतो.

गृहकर्ज असेल, तर ईएमआयचे कॅलक्युलेशन करा

होम लोन घेऊन तुम्ही दुसरे घर घेतले असेल, तर तुमचा मासिक ईएमआय अनेकदा मिळणाऱ्या भाड्यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असू शकतो.अशा परिस्थितीत, उर्वरित रक्कम तुमच्या पगार किंवा बचतीतून भरावी लागेल. त्यामुळे मालमत्तेतून स्वतःचा खर्च भागत आहे की सतत तुमच्या खिशाला कात्री लावत आहे, याचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे.

Maharashtra Timesआता बचतही होणार अन् फायदाही; HDFC बँकेने महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी आणली विशेष स्कीम

ठिकाण सर्वात महत्त्वाचा फॅक्टर

केवळ चांगला फ्लॅट खरेदी करणेच पुरेसं नाही, तर योग्य ठिकाणही सर्वात महत्त्वाचा घटक असतो. रोजगाराच्या अधिक संधी, चांगल्या वाहतूक सुविधा, शाळा आणि महाविद्यालये, आणि घरांना स्थिर मागणी असते, अशा ठिकाणी आकर्षक भाडे मिळण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय भविष्यात मेट्रो सुविधा, नवीन रस्ता किंवा एखादा मोठा प्रकल्प येईल या केवळ आशेवर गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. प्रकल्प लांबणीवर पडला किंवा मागणी अपेक्षेप्रमाणे नसल्यास परताव्यावर परिणाम होऊ शकतो.

मालमतात लवकर विकल्या जात नाही

कमी तरलता रिअल इस्टेटमधील सर्वात मोठे आव्हान असते. तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली, घाईघाई घर विकणे शक्य नसते. योग्य खरेदीदार शोधायला वेळ लागू शकतो. तसेच खरेदी-विक्री करताना मुद्रांक शुल्क, नोंदणी, ब्रोकरेज आणि इतर खर्च देखील करावे लागतात.

Maharashtra TimesGold-Silver Rate: सोन्याने पुन्हा वाढवली धडधड, चांदीही महागली; सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेकराचा परिणामही समजून घ्या

घरभाडे म्हणून मिळणारे उत्पन्न करपात्र असते आणि सध्याच्या नियमांनुसार काही अटी आणि मर्यादांच्या अधीन राहून गृहकर्जावरील व्याज कर सूटसाठी पात्र ठरू शकते. मात्र, भाड्याच्या उत्पन्नावर काही विशिष्ट कपातीनंतर टॅक्स आकारला जातो आणि मिळणारा प्रत्यक्ष लाभ तुमच्या उत्पन्नावर, टॅक्स स्लॅब व कर प्रणालीवर अवलंबून असेल.

अख्खी बचत मालमत्तेत गुंतवणे शहाणपणाचे नाही

तुम्ही तुमची बहुतेक बचत आधीच मालमत्तेत गुंतवलेली असेल तर, दुसरे घर खरेदी केल्यास तुमच्या पोर्टफोलिओमधील शिल्लक रक्कम कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, आपत्कालीन स्थितीसाठी तुमच्याकडे पुरेशी तरल गुंतवणूक शिल्लक राहणार नाही. त्यामुळे, एकाच मालमत्ता प्रकारात प्रमाणापेक्षा जास्त गुंतवणूक केल्याने धोका वाढू शकतो.

दुसरे घर खरेदी कधी फायदेशीर ठरते?

तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, तुमच्याकडे पुरेसा निधी असेल, गुंतवणुकीचा दीर्घकालीन दृष्टिकोन असेल आणि मालमत्तेचे संभाव्य भाडे व भविष्यातील वाढ एकूण खर्चाला योग्य ठरवत असेल तर, दुसरे घर फायद्याची गुंतवणूक ठरू शकते. मात्र, केवळ भविष्यात मालमत्तेच्या किंमती वाढतात याच गृहितकावर गुंतवणूक करणे शहाणपणाचे नाही आणि सर्व खर्चानंतर गुंतवणूक फायदेशीर ठरल्यासच दुसऱ्या घराचा विचार करणे योग्य ठरते.