Chhaya Kadam On Bigg Boss : छाया कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हिंदी बिग बॉसबद्दल भाष्य केलं आहे. त्यांना बिग बॉसची ऑफर आलेली, मात्र अभिनेत्रीनं नकार दिलेला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या ‘भूतम् भयम्’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये छाया कदम यांनी बिग बॉस हिंदीबद्दल भाष्य केलं आहे. छाया कदम यांना बिग बॉस हिंदीसाठी विचारणा झालेली, असं त्यांनी सांगितलं आहे.
छाया कदम यांना आलेली बिग बॉसची ऑफर
मुलाखतीदरम्यान रिअॅलिटी शोबद्दल विचारलं असता छाया कदम यांनी सांगितलं की, ‘खरं सांगायचं तर मला हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती. मी कान्समध्ये पहिल्यांदा गेले होते तेव्हा मला ऑफर आली होती. तेव्हा त्यांना असं वाटत होतं की, मी बिग बॉसमध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्नही केले, पण मला नाही जमलं. कारण माझं असं होतं की नाही आता तरी मला नाही करायचं आहे. पण हो हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती.’
Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा
पुढे रिअॅलिटी शोबद्दल विचारलं असता छाया कदम म्हणाल्या, ‘मला असं वाटतं की तुमच्या खासगी गोष्टी ज्या तुम्हालाच माहीत असतात, ज्या तुमच्याच आहेत त्याबद्दल मी जगासमोर का बोलू? त्यामुळे, मला नाही करायचा आहे, असं मी त्यांना सांगितलं. लोकांना खूप आवडतो. मी त्यांना सांगितलं की तुमचा टीआरपीवगैरे खूप छान आहे. मी जरी नाही म्हटलं असलं तरी माझ्या आजुबाजूचे लोक बिग बॉस बघतात. माझी मावशी खूप बघते. माझं ऐकत नाही तिला खूप आवडतं.’
Brett Lee : प्रीती झिंटासोबतच्या अफेअरच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलला ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटूनं सोडलं मौन दरम्यान, छाया कदम यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘लापता लेडीज’, ‘मडगाव एक्स्प्रेस’, ‘फँड्री’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच बिग बॉस हिंदीबद्दल सांगायचं तर, ‘बिग बॉस २०’ चा प्रोमो प्रदर्शित झाला असून, हा सीझन पूर्णपणे वेगळा आणि ट्विस्टनं भरलेला असणार आहे. होस्ट सलमान खान एका वेगळ्या लूकमध्ये दिसतोय, पण २० वा सीझनसुद्धा एका नवीन स्टाईलमध्ये आहे. निर्मात्यांनी ‘बिग बॉस २०’ च्या प्रोमोसोबत प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘बिग बॉस २०’चा प्रीमिअर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा