Headlines

Nagpur Crime: कुख्यात एमडी तस्कर आशी डेला निर्घृणपणे संपवलं; कन्हान नदीत फेकली बॉडी, प्रियकराचा शोध सुरु


Nagpur Crime News: कुख्यात एमडी तस्कर महिला आशी डेला निर्घृणपणे संपवून बॉडी कन्हान नदीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे.

mumbai crime
मुंबई क्राईम बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीतील कुख्यात एमडी तस्कर महिलेची हत्या करून तिचा मृतदेह कन्हान नदीत फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. अश्विनी ऊर्फ रश्मी ऊर्फ आशी डे (वय २९, रा. खामला) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा प्रियकर मोनू मनपिया याने हत्या केल्याचा संशय असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिस सूत्रांनुसार, आशी आणि मनपिया यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी मनपियाला पिस्तुलासह अटक केली होती. याबाबत आशीनेच पोलिसांना माहिती दिल्याचा संशय त्याला होता. गेल्या काही दिवसांपासून आशी त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरत होती. मात्र, मनपिया टाळाटाळ करीत होता. आशी पुन्हा आपल्याला एखाद्या गुन्ह्यात अडकवेल, अशी भीतीही त्याला वाटत होती.

Maharashtra TimesTukaram Mundhe : एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं
रविवारी रात्री मनपिया आशीच्या घरी गेला. ‘मला घरी सोडून दे’, असे सांगून तो आशीसोबत मोपेडवरून निघाला. दोघे कन्हान नदीच्या पुलावर थांबले. तेथे त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर मनपियाने आशीला मारहाण करून नदीत फेकल्याचा संशय आहे. त्यानंतर तो मोपेड घेऊन पसार झाला. ही घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

दरम्यान, नदीत मृतदेह फेकण्यात येत असल्याचे एका रेल्वे ट्रॅकमॅनला दिसले. त्याने तत्काळ कन्हान पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रवाना केला. सुरुवातीला महिलेची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिचे छायाचित्र आणि हातावर लिहिलेल्या नावासह माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. दुपारी आशीच्या आईने छायाचित्र पाहून तिची ओळख पटवली आणि कन्हान पोलिस ठाणे गाठले. ‘रविवारी रात्री आशी ही मनपियासोबत गेली होती’, असे तिने पोलिसांना सांगितले.

Maharashtra TimesVidarbha Flood: विदर्भात पुरामुळे नऊ जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश, पिकांचे मोठे नुकसान, रस्ते वाहतूक विस्कळीत
पोलिसांनी कन्हान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे २ वाजताच्या सुमारास आशी आणि मनपिया हे मोपेडने कन्हान नदीच्या पुलाकडे जाताना दिसले. त्यानंतर सुमारे तासाभराने मनपिया हा एकटाच मोपेडवरून परतताना आढळला. याआधारे पोलिसांनी संशयीत आरोपी मनपिया याच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा