सावंतवाडी / वार्ताहर : ज्येष्ठ शिवसैनिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाडकर यांच्या निधनानंतर सोमवारी सायंकाळी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात शोकसभा पार पडली. प्रसंगावधान राखून धावून जाणारा, अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारा आणि ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क असलेला कडवट शिवसैनिक अशी त्यांची उपस्थितांनी आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसभेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, उद्धव सेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, समीर वंजारी, सुधीर पराडकर, संदीप टोपले, रमेश गांवकर, सुरेश भोगटे, रमेश बोंद्रे, सीमा मठकर, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, उदय पारिपत्ये, राम वाडकर, विलास जाधव, महेश पांचाळ, रेमी आल्मेडा, प्रमोद सावंत, रश्मी माळवदे, शितोळे, निशांत तोरसकर, राकेश परब, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, अनंत जाधव, सचिन रेडकर, रूपेश हिराप, प्रा. रूपेश पाटील, विनायक गावस, शैलेश मयेकर, प्रसाद माधव, संदेश पाटील, निखील माळकर आदी उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी वाडकर यांनी शिवसेनेच्या विस्तारासाठी सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात केलेले योगदान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील त्यांची निष्ठा, अन्यायाविरोधातील त्यांची भूमिका तसेच पत्रकारिता, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. बबन साळगावकर, भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, समीर वंजारी, रमेश बोंद्रे, चंद्रकांत कासार, अभिमन्यू लोंढे, सुरेश भोगटे, सुधीर पराडकर, रूपेश राऊळ, रमेश गांवकर, गजानन नाईक, संदीप टोपले, प्रा. रूपेश पाटील आणि विनायक गावस यांनी आपल्या भावना व्यक्त करत वाडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
