Jasprit Bumrah ruled out of Sri Lanka Tests Team India big blow Auqib Nabi likely to get place; जसप्रीत बुमराह संघाबाहेर, श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियाला झटका; बदली खेळाडू ठरला, वेगवान गोलंदाजाच्या निवडीची शक्यता
Jasprit Bumrah ruled out of Sri Lanka Tests Team India big blow Auqib Nabi likely to get place; जसप्रीत बुमराह संघाबाहेर, श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियाला झटका; बदली खेळाडू ठरला, वेगवान गोलंदाजाच्या निवडीची शक्यता
Team India Sri Lanka Test Tour : गेल्या आठवड्यात बेंगळुरु येथील भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जसप्रीत बुमराहची सखोल चाचणी झाल्यानंतर बुमराहबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोलंबो : अवघ्या काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी तंदुरुस्त झाला असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय समितीने त्याला श्रीलंका दौऱ्याच्या कालावधीत पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेदरम्यान बुमराहचा गुडघा दुखावला होता. त्यातून तो अद्याप पूर्ण बरा झाला नसल्याचे समितीने भारतीय संघव्यवस्थापनास कळवले आहे.
बुमराहबाबत धोका पत्करायचा नाही
इंग्लंडमधील वनडे मालिकेद्वारे बुमराहने भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यांत तो खेळू शकला नव्हता. त्यावेळी दुसऱ्या सामन्यांत जायबंदी झाल्यामुळे बुमराहला विश्रांती दिली असल्याचे सांगण्यात आले होते. मालिकेतील दुसरा सामना १६ जुलैस झाला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजी केली नसल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेतील मालिका खेळण्यासाठी बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर इंजेक्शन घेतले होते. त्यामुळे त्याच्या गुडघ्यात सुधारणा झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बुमराहची सखोल चाचणी झाली. त्यानंतर बुमराहबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय झाला.
गिलचा विचार करायला लावणारा प्रश्न
वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेनंतर बुमराहच्या दुखावलेल्या गुडघ्यावर उपचार झाले होते. त्यानंतर तो आयपीएलमील १३ सामने खेळला होता. त्यानंतर तो थेट इंग्लंडमधील मालिकेत खेळला होता. इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर शुभमन गिलने भारतीय संघास आघाडीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा प्रश्न चांगलाच भेडसावत असल्याचे सांगितले होते. ‘तीन सामन्यांच्या मालिकेदरम्यान खेळाडू जायबंदी होऊन उपलब्ध होणार नसतील तर वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळीस काय होईल,’ अशी विचारणा गिलने केली होती.
भारतीय संघ श्रीलंकेत पूर्ण ताकदीने जाणार नाही हे स्पष्ट आहे. हर्षित राणा आणि नितिश कुमार रेड्डी हे यापूर्वीच संघाबाहेर गेले आहेत. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसणार हेही निश्चित आहे. त्यापाठोपाठ आता बुमराह संघात नसेल. अजून तरी भारतीय क्रिकेट बोर्डाने बुमराहच्या अनुपलब्धतेची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी पर्यायी खेळाडूची निवडही केलेली नाही.
अकिब नबीला संधी मिळणार?
बुमराहच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकिब नबीला भारतीय कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. परवेझ रसूल आणि उमरान मलिकनंतर तो तिसरा जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू ठरणार आहे. नबीच्या नावाला मुंजरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या दोन रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मिळून नबीने १०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
भारताचा श्रीलंका दौरा
जगज्जेतेपद कसोटी क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखण्यासाठी भारतीय संघास श्रीलंकेतील दोन कसोटींची मालिका महत्त्वाची आहे. मात्र या दोन कसोटीपूर्वींचा चार दिवसीय सराव सामना आता तीन दिवसांचा करण्यात आला आहे. मूळ कार्यक्रमानुसार भारतीय संघ ७ ते १० ऑगस्ट दरम्यान सराव सामना खेळणार होता. श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याचा पुनरुच्चार केला होता. मात्र त्याचा कालावधी आता ७ ते ९ ऑगस्ट असेल. भारतीय क्रिकेट बोर्ड तसेच भारतीय संघव्यवस्थापनास याबाबत कळवण्यात आले आहे. पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ ४ ऑगस्टला कोलंबोस रवाना होईल. तीन दिवसांच्या सराव सामन्यानंतर संघ गॉल येथे रवाना होईल. याच ठिकाणी मालिकेतील पहिली कसोटी आहे. मालिकेतील दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर होणार आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा