Headlines

Gold Price Outlook; होर्मुझ संकटात सोनं-चांदीचे मार्केट डाऊन, तरी खरेदीदार नाही, गुंतवणूकदार सावध; गोल्डवर डॉलर का वरचढ ठरला?

Gold Outlook 2026: सोने आणि चांदीच्या अलीकडच्या चढ-उतारांनी गुंतवणूकदारांना विचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या एका वर्षभरात भरभराट केलेल्या सोन्या-चांदीच्या किमती प्रचंड कमी झाल्या ज्यामुळे एकीकडे गुंतवणूकदारांची मनात धडधड वाढली तर, खरेदीदारांमध्ये स्वस्ताईची आशा निर्माण झाली.

Gold Silver Prediction 2026
भविष्यात सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार?
Gold Price News: मागील सहा महिन्यात सोन्याची किंमत 37000 रुपयांनी घसरली, तर चांदीचा भाव दोन लाख रुपयांनी उताराला आहे. गेल्या वर्षभरातील सोने-चांदीने फिनिक्स झेप घेऊन गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला चार चाँद लावलेले पण, अलीकडच्या घसरणींनंतर आता वर्षाच्या उर्वरित महिन्यांत सोन्याच्या किमती कोणत्या दिशेने जाईल? किमती वाढतील की आणखी घसरतील?

2026 मध्ये सोने-चांदीचा दर

2026 मध्ये सोने-चांदीचा दर

साल 2026 ची सुरुवात सोन्यासाठी सकारात्मक राहिली. डिसेंबर 2025 ते 29 जानेवारी 2026 या काळात सोन्याच्या दरांनी उंचच उंच उभारी घेतली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अवघ्या 29 दिवसांत सोन्याचा दर 1.33 लाखांवरून 1.76 लाखांपर्यंत उसळला, पण त्यानंतर सोन्याच्या दरवाढीला घसरणीचे ग्रहण लागले आणि मग अद्यापही उच्चांकानजीक पोहचू शकलेले नाही.

सोन्याच्या दरानं उतरती कळा

सोन्याच्या दरानं उतरती कळा

फेब्रुवारीच्या शेवटपासून पश्चिम आशियात इराण युद्धाचा भडका उडाल्यापासून सोन्याची झळाळी अंदाजे 37000 रुपयांनी उतरली. अशा परिस्थितीत, लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोने खरेदीदारांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की सोन्याचा दर आणखी घसरणार की पुन्हा वाढू लागतील? त्याचबरोबर, युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याचे दर इतके कसे घसरले हाही प्रश्न आहे. जे सोने सहसा युद्ध किंवा तणावात महाग होते, यावेळी उलट दिशेने का जात आहे? रशिया-युक्रेन युद्धादरम्यान सोन्याची स्थिती सर्वांनी पाहिली, पण आखाती युद्धात सोन्याचा रंग कसा बदलला?

उच्चांकावरून 37000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

उच्चांकावरून 37000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

29 जानेवारी 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1.79 लाख रुपये होता, जो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1.42 लाखांवर घसरला आहे. अशाप्रकारे, सोन्याची किंमत या सहा महिन्यांत 37000 रुपयांनी कमी झाली असून एक किलो चांदीचा भाव 3.89 लाखांवरून 2.19 लाख रुपये किलोवर घसरला. अशाप्रकारे, चांदी आपल्या ऑल-टाइम उच्चांकावरून 1.70 लाखांनी स्वस्त झाली.

सोन्याची किंमत सतत का घसरतेय?

सोन्याची किंमत सतत का घसरतेय?

मध्यपूर्वेतील युद्धामुळे क्रूडच्या दरात भडका उडाला आणि डॉलरही मजबूत झाला. सतत मजबूत होणारा अमेरिकी डॉलर आणि ट्रेझरी बाँड यील्डमुळे सोन्याच्या दरवाढीला लगाम लागली. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती सातत्याने घसरत असून यामुळे MCX आणि सराफा बाजारावर दबाव येत आहे. तसेच फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदर वाढवले नसून फेडच्या निर्णयामुळे सोन्यावरील दबाव आणखी वाढला असता आणि घसरण आणखी खोलवर गेली असती.

भविष्यात सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार?

भविष्यात सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार?

फेडरल रिझर्व्हने व्याजदर अपरिवर्तित ठेवले असून महागाईबाबत कठोर भूमिका, मजबूत कामगार बाजार आणि वाढत्या तेलाच्या किमती पाहता नजीकच्या भविष्यात दर कपातीची शक्यता कमी आहे. याव्यतिरिक्त इराण युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीही ठप्प झाली आहे. हुती बंडखोरांनी लाल समुद्रात तणाव वाढवला, ज्यामुळे भू-राजकीय तणाव आणखी वाढला असून आणखी युद्ध अद्याप संपलेले नाही आणि अमेरिका व इराण यांच्यात लवकरच युद्धविराम झाला नाही, तर कमोडिटी बाजारातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. क्रूडच्या दरांवरील दबाव वाढल्यास गुंतवणूकदार सोन्यापासून आणखी दूर जाऊ शकतात. पण युद्धविराम, ऊर्जा किमतींवरील दबाव कमी होणे यांसाख्या हालचालींमुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे वळू लागतील ज्यामुळे सोन्याच्या किमतींना अतिरिक्त आधार मिळेल.

सोन्याची किंमत कुठवर जाणार?

सोन्याची किंमत कुठवर जाणार?

सोन्या-चांदीची किंमत प्रचंड घसरली आहे. सोनं 37000 रुपये तर चांदीची किंमत 1.70 लाखांनी कमी झाली असून आता सोन्यातील गुंतवणूक वाढणार का? हाच मोठा प्रश्न सध्या गुंतवणूकदारांच्या मनात घोंघावत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव 1.60 लाख आणि चांदीचा भाव 2.80 लाख रुपये किलोपर्यंत वाढण्याचा एक्सपर्टचा अंदाज आहे. ऑगस्ट 2026 मध्ये सोन्याचा टेक्निकल चार्ट पाहिल्यास मंदीचा कल दिसत आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा