फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने धाराशिवच्या राजकारणात मैत्रीचं नवं पर्व पाहायला मिळालं. नुकतेच शिंदेसेनेत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे भाजपच्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या. भाजप आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात ओमराजे उपस्थित राहिले आणि बसवराज पाटलांसोबत त्यांच्या मनमोकळ्या गप्पा देखील झाल्या. मात्र इथले भाजपचे दुसरे आमदार आणि ओमराजेंचे कट्टर विरोधक राणाजगजीतसिंह पाटील यांना मात्र कार्यक्रमातून डावलण्यात आल्याची चर्चा आहे.