Headlines

Conversion Act: धर्मस्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब! विधेयकावर राष्ट्रपतींची मोहोर; तुरुंगवास अन् दंडाचीही कायद्यात तरतूद – president droupadi murmu clears maharashtra freedom of religion act


Maharashtra Freedom Conversion Act: आता बेकायदा धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये नव्या कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

conversion act
धर्मस्वातंत्र्य(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : राज्यात जबरदस्तीने आणि आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला धर्मस्वातंत्र्य कायदा आता राज्यात लागू झाला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर राज्यात धर्मांतरविरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ लागू झाला आहे. ३० जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून हा कायदा आता अंमलात आला आहे.
Maharashtra TimesMaharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात मोठा पाऊस येणार, राज्यभरात धुमाकूळ घालणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
राज्यात जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी; तसेच इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने तत्कालीन पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६’चा मसुदा सरकारकडे सादर केला होता. समाजाला दहशतीखाली ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला होता.

धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला सरकारला आगाऊ याची माहिती देणे बंधनकारक असल्याने अशा व्यक्तींची माहिती सार्वजनिक होऊन त्यांना त्रास देता येईल, असाही धोका विरोधकांकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच अल्पसंख्यांक या कायद्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केली. कुणी कुठल्या देवाला, संताला मानायचे हा सरकारच्या परवानगीचा विषय नाही. राज्यघटनेचे कलम २५ आणि २६ हे धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य देते. धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही, त्यामुळे या कायद्याला न्यायालयात आव्हान देऊ असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
Maharashtra TimesPravin Darekar : देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला गरज, लोकं त्यांना दिल्लीला पाठवण्याची का घाई करत आहेत? प्रवीण दरेकर यांचा सवालओडिशात १९६७ पासून…
सध्या देशातील १२ राज्यांमध्ये हा कायदा असून ओडिशा राज्यात १९६७ साली तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हरयाणा या राज्यात तो मंजूर करण्यात आला आहे.

कायद्यातील तरतुदी…
-स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे ६० दिवस आधी लेखी सूचना देणे बंधनकारक असेल
-त्यावर कोणाचाही आक्षेप असल्यास त्यांना सार्वजनिक हरकती नोंदविता येतील
-अशा व्यक्तीची पोलिस चौकशी होईल
-धर्मांतर झाल्यानंतर २१ दिवसांच्या संबंधिताने जाहीर प्रकटीकरण करणे गरजेचे
-तसे न केल्यास ते धर्मांतर रद्दबातल समजण्यात येईल
-धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भाऊ-बहीण किंवा रक्ताचे नातेवाइक याविरोधात तक्रार दाखल करू शकतात.
Maharashtra TimesRaj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप
सक्तीने धर्मांतर हा गुन्हा
कायद्यानुसार, राज्यात कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असेल. यात दोषी आढळल्यास धर्मांतर करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती, जमातींमधील व्यक्तींच्या बाबतीत गुन्ह्यास कठोर शिक्षा व पाच लाख रुपयांपर्यंत दंड असेल. पुन्हा हा गुन्हा केल्यास दहा वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकणार आहे.

धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह बेकायदा
केवळ धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह आता न्यायालयाकडून अवैध ठरवले जातील. मात्र, अशा विवादास्पद विवाहातून जन्माला आलेल्या बालकांच्या हक्कांचे पूर्ण संरक्षण यात करण्यात आले आहे. अशा बालकांना आई-वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण अधिकार असेल आणि त्यांच्या अभिरक्षेचा (कस्टडी) अधिकार आईकडेच राहील, अशी महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. तसेच, बालकांचा धर्म हा विवाहापूर्वी आईचा जो धर्म असेल, तोच राहील.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा