Viral Story India: ‘१ कोटींच्या फ्लॅटमध्ये राहतात आणि ३०० रुपयांचं सामान चोरतात’, महिलेनं श्रीमंत घरांतील लोकांना केलं एक्सपोझ, व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल. लोक म्हणताहेत, काही माणसं पैशांनी श्रीमंत पण विचारांनी गरीब असतात.
(फोटो सौजन्य – ritika_khanna_/instagram)
काही लोक कोट्यवधींच्या घरांमध्ये राहतात, पण त्यांची प्रवृत्ती मात्र चोरांसारखीच असते, असा अनुभव सांगणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
घडलं असं की, एका महिलेनं ऑनलाइन ॲपवरून दूध, ब्रेड, अंडी आणि इतर काही सामान मागवलं होतं. ती एका अत्यंत लक्झरी सोसायटीमध्ये राहते. त्या सोसायटीमध्ये घरांचे नंबर सारखेच असून विंग वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे डिलिव्हरी बॉय गोंधळला आणि त्यानं चुकीच्या घरात सामान पोहोचवलं.
व्हायरल व्हिडीओमधील महिला सांगते की, त्या घरातील लोकांनी ते सामान स्वीकारलं आणि स्वतःजवळ ठेवलं. काही वेळानंतर सामान ऑर्डर करणाऱ्या महिलेनं कस्टमर केअरशी संपर्क साधून, बराच वेळ झाला तरी सामान घरी पोहोचलं नसल्याची तक्रार केली. त्यावेळी तिला सामान डिलिव्हर झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर चौकशी करण्यात आली आणि तेव्हा खरा गोंधळ लक्षात आला.
अनपेक्षित प्रकार पुढे घडला…
हा व्हिडीओ ritika_khanna_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. पुढे महिला सांगते की, तिला फारच विचित्र अनुभव आला. जेव्हा डिलिव्हरी बॉय सामान परत घेण्यासाठी त्या घरी पोहोचला, तेव्हा त्या घरातील लोकांनी सामान गुपचूप परत करण्याऐवजी उलट सामान मागवणाऱ्या महिलेलाच दम भरला. “आमच्या घरी सामान आलं, तर आम्ही ते वापरणार,” असं त्यांनी म्हटलं.
शेवटी डिलिव्हरी बॉयनं कसाबसा हा प्रकार हाताळला आणि ते सामान मूळ मालकापर्यंत पोहोचवलं. मात्र, या अनुभवातून महिलेनं व्हिडीओच्या शेवटी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. “ही मंडळी कोट्यवधी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहतात, पण ३०० रुपयांच्या सामानासाठी, जे त्यांचं नाही, त्यासाठीही हुज्जत घालतात. यावरून काही लोकांची प्रवृत्ती चोरांसारखीच असते,” असं तिनं म्हटलं.
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
हा व्हिडीओ ५१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत महिलेचं कौतुक केलं आहे. कारण तिनं या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयला दोष न देता, त्याला अडचणीत आणणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. या व्हिडीओवर ८ हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा