सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक इतिहास राहिलेला आहे. लोकनेते विलासकाका उंडाळकर यांनी बँकेच्या कमाकाजा शिस्त लावली. याशिवाय अनेक दिग्गजांनी बँकेचं नेतृत्व केलं. पण आज याच बँकेच्या निवडणुकीत सुरु असलेल्या घडामोडींची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : देशातील सहकारी बँकांमध्ये सर्वात अग्रगण्य असल्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद प्रतिष्ठेचे मानले जाते. अनेक धुरीनांनी या बँकेचे नेतृत्व केले. त्यात लोकनेते दिवंगत विलासराव उंडाळकर यांचे सर्वाधिक काळ बँकेवर एकहाती वर्चस्व होते. त्यांच्या कडक शिस्तीमुळेच बँकेने नाबार्डचे सलग सहा पुरस्कार पटकावले. मृत्यूशय्येवर असतानाही त्यांना बँकेचीच काळजी होती. विलासकाकांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या जिल्हा बॅंकेत सध्या सत्ताकारणाचा भलताच खेळ सुरू आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना १५ ऑगस्ट १९४९ रोजी झाली. २ लाख रुपये भागभांडवलावर बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. लोकनेते बाळासाहेब देसाई हे बँकेचे पहिले अध्यक्ष आणि नीळकंठराव कल्याणी उपाध्यक्ष झाले. त्यानंतर अनेक धुरिणांनी या बँकेचे नेतृत्व केले. त्यात विलासकाका उंडाळकर यांचाही सामावेश होता. १९६७ ते २०२१, असे तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ ते संचालक होते. काही काळ ते बँकेचे अध्यक्षही होते.
विलासकाका उंडाळकर हे यशवंतराव चव्हाण आणि देशभक्त किसन उर्फ आबासाहेब वीर यांच्या तालमीत तयार झालेले नेते होते. त्यामुळे विश्वस्त म्हणून काम करताना त्यांनी बँकेला कडक शिस्त लावली. तब्बल चाळीस वर्षे बँकेवर त्यांचे एकहाती वर्चस्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेला सलग ६ वेळा नाबार्डचे पुरस्कार मिळाले. ते कराड दक्षिण मतदारसंघातून सलग ७ वेळा (३५ वर्षे) आमदार म्हणून निवडून आले होते.
सध्या बँकेच्या निवडणुकीत चुरस
नवीन सहकार कायद्यानुसार सलग दहा वर्षे संचालक असणाऱ्या मातब्बरांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आपल्याच कुटुंबातील सदस्य अथवा निकटवर्तीयाची वर्णी लावण्यासाठी सध्या मोठा खटाटोप सुरू आहे. एकेकाळी बँकेची निवडणूक झालेली सुद्धा कळत नव्हती. मात्र, विलासकाकांच्या निधनानंतर बँकेच्या कारभारात धाकच उरला नाही. संचालकांच्या सहली, पळवापळवी आणि पोलीस बंदोबस्तात ठराव होत आहेत.
विलासकाका उंडाळकरांना बँकेविषयी असलेल्या तळमळीचा किस्सा फार महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या काळात विलासकाका आजारी पडले. साताऱ्यातील एका रूग्णालयात ते ॲडमिट होते. निर्बंध थोडे शिथिल झाल्यानंतर त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून बॅलन्सशीटची माहिती घेतली.
‘बॅंकेत गोरगरीबांचे पैसे आहेत. त्यांना मदत करा. आपण बँकेचे मालक नाही. विश्वस्त आहोत. बँक चांगली चालवा. तू पण सामान्य कुटुंबातील आहेस म्हणून नोकरी लावली. आता तुलाच लक्ष ठेवावे लागेल’, असेही बजावले होते. इतकी काळजी करणाऱ्या विलासकाकांच्या पश्चात बँकेची निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे, त्याची चुणूक जावळी तालुक्यातील घटनेतून दिसली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा