Sooraj Pancholi Post : जिया खान मृत्यू प्रकरणातून सूरज पांचोलीची १४ वर्षांनी सुटका झाली. त्याबद्दल अभिनेत्यानं पोस्ट शेअर केली आहे.

सूरज पांचोलीची पोस्ट
सूरज पांचोलीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मी सर्व माध्यमांना विनंती करतो. तुमच्या मते कोणता प्रश्न अनुत्तरित राहिला आहे, ते मला सांगा. मी १४ वर्षे या न्यायालयीन खटल्याचा सामना केला आहे. या खटल्याचा निर्णय तथ्य, पुरावे आणि कायद्याच्या आधारावर झाला. माझी निर्दोष मुक्तता झाली आहे आणि कायदेशीर प्रक्रियेत कोणताही प्रश्न अनुत्तरित राहिलेला नाही. न्यायालयाची सर्व कागदपत्रे आणि खटल्याची कार्यवाही सर्वांसाठी उपलब्ध आहे, आणि एखादं मत बनवण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्या.’
सूरजचं करिअर घडवण्यासाठी आदित्य पांचोलीचे प्रयत्न
‘ही घटना घडली तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. मी तिला जेमतेम चार महिनेच ओळखत होतो आणि ती कोणत्या परिस्थितीतून जात होती याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी, एखादी व्यक्ती स्वतःच्या मनात किती दुःख दडवून ठेवू शकते हे समजण्याइतका मी लहान होतो. पुढे जे घडलं, त्यानं माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं.’
Divya Bharti : ‘मला वाचवा…’ दिव्या भारतीचा शेवटचा सीन अन् दुसऱ्या दिवशी तिच्या निधनाची बातमी; दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग
माझी निर्दोषता सिद्ध करायला १४ वर्षे लागली…
सूरज पांचोली पुढे म्हणाला, ‘माझी निर्दोषता सिद्ध करायला मला १४ वर्षे लागली. ही ती वर्षे होती जेव्हा मी माझं आयुष्य घडवत होतो. असं असूनही, मी या खटल्याच्या ओझ्याखाली जगत राहिलो. दररोज माझ्या मनात आणि हृदयात काय चाललं होतं, हे फक्त मलाच माहीत आहे. न्यायालय हे एकमेव ठिकाण होतं जिथे मी माझी निर्दोषता सिद्ध करू शकलो असतो. मी न्यायिक प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि १४ वर्षांनंतर, या खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली. यानंतरही जर लोक मला दोषी मानत असतील आणि माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, तर खरं सांगायचं तर, मी आणखी काय करू शकतो हे मला माहीत नाही.’
‘मी शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण शांत राहण्याचा अर्थ असा नाही की मी कोणालाही माझ्याबद्दल काहीही लिहिण्याचा अधिकार दिला आहे. तिनं जे काही वैयक्तिक अनुभव आणि दुःख मला सांगितली, त्याबद्दल मी कधीही जाहीरपणे बोललो नाही. सर्व अडचणी असूनही, मी तिच्या प्रायव्हसीचा आदर केला. बदल्यात मला फक्त तोच आदर आणि न्याय हवा आहे.’ असं सूरजनं शेवटी म्हटलंय.
Milind Pathak : ‘रील स्टार्सना सिनेमाच्या प्रमोशनसाठी बोलावतात, ज्यांनी सिनेमा बनवला त्यांच्या कष्टाला किंमत नाही’, मराठी अभिनेत्याचं बेधडक वक्तव्य
काय घडलेलं नेमकं?
दरम्यान, २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खाननं आत्महत्या केली. त्यावेळी एक सुसाईड नोट सापडली होती. अभिनेत्रीच्या आईनं सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले. यानंतर सूरज पांचोलीला अटकही झाली. काही काळानंतर त्याची जामिनावर सुटका झाली, पण हे प्रकरण अनेक वर्षे चाललं. या काळात त्याला कोणतंही काम मिळालं नाही. दरम्यान, सूरजने त्याच्यावरील आरोप सातत्यानं नाकारले. दहा वर्षांनंतर, एप्रिल २०२३ मध्ये न्यायालयाचा निकाल सूरज पांचोलीच्या बाजूने लागला आणि त्याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली.

