DA Hike for June 2026 Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगासोबतच DA म्हणजे महागाई भत्ता वाढीबाबतही कुजबुज सुरू आहे. जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3 टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 3% वाढल्यास एकूण भत्ता 63% पर्यंत पोहोचू शकतो.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट
जानेवारी 2026 नंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून नवीन डीए वाढ दिली जाईल, ज्याच्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. जुलै 2026 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ अपेक्षित आहे, ज्यामुळे एकूण भत्ता 63 टक्क्यांवर पोहोचेल. यासह देशभरातील सुमारे 50.14 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन वाढेल.
LPG Cylinder Price Today 1 August: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा; व्यावसायिक एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त! घरगुती गॅसच्या दराच काय?
जून 2026 च्या AICPI-IW आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढीचे संकेत मिळत आहेत. पण, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता AICPI-IW डेटाच्या आधारे मोजला जातो. अर्थ मंत्रालयाच्या कामगार ब्युरोने जून 2026 मध्ये जाहीर केलेला AICPI-IW निर्देशांक 151.9 वर पोहोचला असून जुलै 2025 ते जून 2026 या 12 महिन्यांची सरासरी 148.65 आहे. यानुसार महागाई भत्त्याचे कॅलक्युलेशन अंदाजे 63.76% इतके होते.
3% डीए वाढीवर पगार किती वाढणार?
अशाप्रकारे, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA जुलैपासून 3 टक्के वाढल्यास एकूण महागाई भत्ता 63 टक्के होईल. अशा परिस्थितीत, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30,000 रुपये असेल, तर पगारवाढ साधारणपणे खालीलप्रमाणे असेल:
- मूळ पगार 30000 रुपये
सध्याचा 60% महागाई भत्ता 180000 रुपये
63% महागाई भत्ता 18,900 रुपये
म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगारात 900 रुपयांची वाढ होईल, जी वार्षिक आधारावर 10,800 रुपये होईल. म्हणजेच मूळ पगार जितका जास्त असेल, तितका महागाई भत्ता वाढवण्याचा फायदा जास्त मिळेल.
महागाई भत्त्यातील 3% वाढीमुळे पगारात किती बदल होईल?
| वेतन स्तर | किमान मूळ वेतन (प्रति महिना) | महागाई भत्त्याची रक्कम (60% दराने) | महागाई भत्त्याची रक्कम (63% दराने) | दरमहा पगारवाढ | सहा महिन्यांची थकबाकी |
| लेव्हल 1 | 18,000 रुपये | 10,800 रुपये | 11,340 रुपये | 540 रुपये | 3,240 रुपये |
| लेव्हल 2 | 19,900 रुपये | 11,940 रुपये | 12,537 रुपये | 597 रुपये | 3,582 रुपये |
| लेव्हल 3 | 21,700 रुपये | 13,020 रुपये | 13,671 रुपये | 651 रुपये | 3,906 रुपये |
| लेव्हल 4 | 25,500 रुपये | 15,300 रुपये | 16,065 रुपये | 765 रुपये | 4,590 रुपये |
| लेव्हल 5 | 29,200 रुपये | 17,520 रुपये | 18,396 रुपये | 876 रुपये | 5,256 रुपये |
| लेव्हल 6 | 35,400 रुपये | 21,240 रुपये | 22,302 रुपये | 1,062 रुपये | 6,372 रुपये |
| लेव्हल 7 | 44,900 रुपये | 26,940 रुपये | 28,287 रुपये | 1,347 रुपये | 8,082 रुपये |
| लेव्हल 8 | 47,600 रुपये | 28,560 रुपये | 29,988 रुपये | 1,428 रुपये | 8,568 रुपये |
| लेव्हल 9 | 53,100 रुपये | 31,860 रुपये | 33,453 रुपये | 1,593 रुपये | 9,558 रुपये |
| लेव्हल 10 | 56,100 रुपये | 33,660 रुपये | 35,343 रुपये | 1,683 रुपये | 10,098 रुपये |

