Headlines

Income Tax Return Filing; एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले; CA ने सांगितले कारण


Income Tax Return Filing: एक कोटींची कमाई 3-3 घरांचा मालक असलेल्या एका आयआयटीयनला आयकर भरण्यासाठी 15000 रुपये उसने घ्यावे लागल्याची धक्कादायक व्हायरल कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

CA IITian Viral Story
एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले;(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Income Tax News: जास्त पगार म्हणजे आयुष्यात पैशाची कोणतीच चिंता नाही, असे अनेकदा लोक गृहीत धरतात. पण एका चार्टर्ड अकाउंटंटने (सीए) अलीकडेच अशी सत्यकथा सांगितली, जी आपल्या समाजातील या समजुतीला आव्हान देणारी आहे.

एखाद्या व्यक्तीला लाखो रुपयांचा पगार, वर्षाला कोट्यवधींचे पॅकेज आणि अनेक घरांचा मालक असलेल्या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसेल, असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. पण, सोशल मीडियावर एक असं प्रकरण समोर आलं आहे जे तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. सध्या देशात इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा हंगाम सुरू असून 31 जुलैपर्यंत करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

Maharashtra TimesTenant Rights: भाडेकरू आहात? घरमालक Rent Receipt देत नसेल तर घाबरू नका! जाणून घ्या तुमचे हक्क, वादावर लागेल ब्रेक
कागदावर करोडपती दिसणाऱ्या एका व्यक्तीला केवळ 15000 रुपये टॅक्स भरण्यासाठी मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागले. या रंजक प्रकरणामागील संपूर्ण सत्य जाणून घेऊया.

Maharashtra TimesMillionaire Post: अमेरिकेत 100 कोटी रुपये कमवणारा भारतातल्या एका छोट्याशा गावात का राहतोय? उद्योगपतीची मनाला भावणारी पोस्ट

एक आयआयटीयन क्लायंट अन् CA ची व्हायरल पोस्ट

चार्टर्ड अकाउंटंट प्रतिभा गोयल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका क्लायंटबद्दल (ओळख उघड न करता) पोस्ट सामायिक केली, जी सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाली. अलीकडेच गोयल यांनी एका तरुण आयआयटी पदवीधराचा ITR दाखल केला, जो गेल्या पाच वर्षांपासून वार्षिक 1 कोटींपेक्षा जास्त कमावतो. बक्कळ उत्पन्न, मालकीची तीन घरे आहेत, त्यापैकी दोन घरांचे बांधकाम सुरू आहे. अशाप्रकारे, साहजिकच प्रभावी उत्पन्न आणि संपत्ती पाहता या व्यक्तीकडे अमाप पैसा असणार असंच कोणालाही वाटेल. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला, जेव्हा आयटीआर दाखल करण्याची वेळ आली.

Maharashtra TimesGold Rate Today: सोन्या-चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! सराफा बाजारांत अस्थिरता; 90 दिवसांत गोल्डची मागणी 6% घटली, आताच खरेदी करावं का?

15,000 रुपये उसने घ्यावे लागले

सीए प्रतिभाने क्लायंटला कर म्हणून उर्वरित 15000 रुपये भरण्यास सांगितले, तेव्हा त्याने आपल्याकडे सध्या रोख रक्कम नाही आणि ऑगस्टपर्यंत आयटीआर दाखल करणे पुढे ढकलावे जेणेकरून पुढचा पगार आल्यावर पैसे भरू शकेल असे सांगितले. मात्र, सीएने समजावून सांगितले की मुदतीनंतर मोठे व्याज आणि दंड भरावा लागेल, तेव्हा त्या आयआयटीयनला दंड टाळण्यासाठी 15000 रुपये ऊसने घेण्यास भाग पडले.

भरघोस कमाई करूनही तुमच्याकडे लगेच खर्च करण्यासाठी पैसे नसतील तर कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे या घटनेतून स्पष्टपणे दिसून येते. यामधून स्पष्ट होते की, केवळ जास्त पैसे कमावणे पुरेसे नाही. प्रत्येकाने कर भरण्यासाठी पैसे बाजूला ठेवणे, आपत्कालीन निधी उभारणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा