Pakistan News: भारतात कॉकरोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता पाकिस्तानातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गृहमंत्र्यांनी सरकारला सावध केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारलादेखील तरुणांच्या विरोधाची, असंतोषाची भीती वाटू लागली आहे. यंत्रणा व्यवस्थित न झाल्यास कॉकरोच सगळं काही बदलून टाकू शकतात, अशी भीती पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी बोलून दाखवली आहे. नक्वी यांनी आपल्याच सरकारला धोक्याची जाणीव करून दिली आहे. ‘तुम्ही यांना तरुण म्हणा, कॉकरोच म्हणा किंवा अन्य काही म्हणा. जर ते एकत्र आले तर सगळं काही उधळून लावू शकतात. मोठी उलथापालथ घडवू शकतात,’ असं विधान नक्वी यांनी केलं आहे.
पाकिस्तानात सध्याच्या घडीला महागाई, अर्थव्यवस्था, कर्ज, हिंसाचार, बेरोजगारी अशा विविध समस्या आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या सगळ्यांचा उल्लेख करत देशात आर्थिक समस्या असल्याची कबुली दिली. सोबतच त्यांनी तरुणाईच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची भीतीही बोलून दाखवली आहे. ‘जर हे कॉकरोच एकत्र आल्यास ते सगळं काही उलथवू शकतात. यंत्रणांनी नीट काम करावं असं त्यांना वाटतं. न्याय, मेरिट, नोकरीच्या संधी सर्वांसाठी समान असाव्यात, असं त्यांना वाटतं. आपण आपल्या तरुणांना हे सगळं देऊ शकलेलो नाही. त्यांना तरुण म्हणा किंवा कॉकरोच म्हणा किंवा अन्य काही म्हणा. जर ते एकत्र आले तर ते सगळं काही बदलू शकतात,’ असं नक्वी यांनी म्हटलं. China J-20 Fighter Jets: चीनकडून 12 ‘मायटी ड्रॅगन’ भारताच्या दिशेनं तैनात; J-20च्या आडून LAC जवळ चीनचा ‘स्टील्थ गेम’ नक्वी यांनी आपल्याच सरकारला सावध केलं आहे. ‘कॉकरोच भडकण्याआधी आपल्याला त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. मेरिटच्या आधारे नोकऱ्या, रोजगाराच्या चांगल्या संधी मिळाव्यात असं तरुणांना वाटतं. आपण यावर लक्ष द्यायला हवं,’ असा सल्ला नक्वी यांनी त्यांच्याच सरकारला दिला.
पाकिस्तानचे गृहमंत्री नक्वी यांनी तरुणांच्या वाढत्या रोषाकडे लक्ष वेधलं. भारतात झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचा दाखला त्यांनी दिला. पाकिस्तानातही कॉकरोचसारखा उद्रेक होऊ शकतो. आपल्या तरुणांना जे हवंय, ते आपण देऊ शकत नसल्याची प्रांजळ कबुली नक्वी यांनी दिली. पाकिस्तानातील शासन व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. देशातील ७० वर्षे जुना ढाचा पूर्णपणे बिनकामाचा आहे. त्यात आमूलाग्र बदलांची गरज आहे, असं नक्वी म्हणाले. Iran Attacks Chinese Firm: इराणचं चाललंय काय? मित्रदेश चीनलाच धक्का, कंपनीवर क्षेपणास्त्रं डागली; जग आश्चर्यचकित मोहसीन नक्वी यांनी गेल्या वर्षी आशिया चषकाची ट्रॉफी घेऊन पळ काढला होता. २८ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानचा पराभव करून स्पर्धा जिंकली. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेला संघर्ष या पार्श्वभूमीवर भारतीय संघानं नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. तेव्हा नक्वी आशिया चषकाची ट्रॉफी त्यांच्या सोबत घेऊन गेले होते. त्यावरुन बराच वाद झाला होता.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा