![]()
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटस, व्हिडिओ संदेश आणि तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून माजी तानाजी सावंत यांच्या पीएवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र रुपनवर असे संबंधित डॉक्टरचे नाव असून ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. गेल्या दोन वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. बंदूक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या फिटनेस प्रमाणपत्राच्या प्रक्रियेदरम्यान वाद निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते म्हणतात की, २८ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या अंगरक्षकाने आपल्याशी धक्काबुक्की केली. तसेच, तानाजी सावंत यांचे पीए प्रसाद कोंडे देशमुख यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ‘तक्रार केली, पण माझ्यावरच चौकशी’ डॉ. नवल यांनी व्हिडिओमध्ये पुढे दावा केला आहे की, या प्रकाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर संबंधितांवर कारवाई होण्याऐवजी स्वतःवरच चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे आपण पूर्णपणे एकटे पडलो असून, न्याय मिळण्याची आशा संपल्याची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी व्यक्त केले. आपल्याला झालेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा दावा करत, “माझ्याकडे आता शेवटचा एकच पर्याय उरला आहे,” असेही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. व्हॉट्सॲप स्टेटसवर सुसाईड नोट डॉक्टरने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ती व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवल्याचाही दावा व्हिडिओमध्ये केला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडीकडून मिळालेल्या कथित वागणुकीमुळे आपले मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगत, “मला न्याय मिळावा, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तळहातावरही लिहिला मजकूर घटनेदरम्यान डॉक्टरने आपल्या तळहातावरही एक संदेश लिहिला होता. त्यामध्ये, “माझा संशयास्पद मृत्यू झाल्यास त्याला प्रसाद कोंडे देशमुख जबाबदार असतील,” असा मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. अधिकृत तक्रार नाही, चौकशीची मागणी दरम्यान, या प्रकरणात फलटण पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. तसेच उपजिल्हा रुग्णालय प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय किंवा पोलिसांकडून या कथित सुसाईड नोट, व्हिडिओ अथवा सोशल मीडियावरील दाव्यांना अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येची आठवण ताजी दरम्यान, फलटण उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वीही एका महिला डॉक्टरने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातही फिटनेस प्रमाणपत्राशी संबंधित कामकाजातून निर्माण झालेल्या दबावाचा उल्लेख करण्यात आला होता. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
Source link
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न:तानाजी सावंतांच्या पीएवर गंभीर आरोप, तळहातावर सुसाईड नोट लिहिली
