Headlines

Pune Rajaram Bridge Rickshaw Accident Youth Dies due to Brain Death Organs Donated Four Patients; धावताना रिक्षाची धडक, गंभीर दुखापतीमुळे ‘ब्रेन डेड’, मृत्यूशी झुंज अपयशी; आई-बापाच्या निर्णयामुळे लेक जाताना चौघांना जीवदान देऊन गेला


Pune Youth Organs Donated for Four Patients : डॉ. तुषार बोर्डे, डॉ. प्रदीप दळवी, डॉ. प्रसन्न मुरुडवार, डॉ. निनाद देशमुख, डॉ. सचिन पळणीटकर, डॉ. सुजित सराफ, डॉ. शिल्पा सावंत, डॉ. रोहन वळसंगकर यांनी अवयवदानाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Pune Youth Organs Donated for Four Patients
पुणे ब्रेन डेडमुळे तरुणाचा मृत्यू तरुणामुळे चौघांना जीवदान(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : धावण्याचा सराव करताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३७ वर्षीय तरुणाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी नऊ दिवस शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारांदरम्यान मंगळवारी मेंदूचे कार्य थांबल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आणि त्याला मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले. अशा दुःखद क्षणी कुटुंबीयांनी तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने चार गंभीर रुग्णांना अवयव मिळाले.

धावताना रिक्षाची धडक

हा तरुण रविवारी (१९ जुलै) सकाळी राजा मंत्री रस्ता (डी. पी. रोड) परिसरातील राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यान धावण्याचा सराव करीत होता. त्याला अज्ञात रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मेंदूवरील गंभीर दुखापतीमुळे त्याच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.
Maharashtra TimesHigh Court on FDA : एफडीएने किती राजकीय नेत्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

कुटुंबीयांनी ठेवले दु:ख दूर

रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी त्यांना अवयवदानाचे महत्त्व आणि त्यातून इतरांना मिळू शकणाऱ्या नवजीवनाची माहिती दिली. दुःख बाजूला ठेवून कुटुंबीयांनी अवयवदानाला संमती दिली. कुटुंबीयांच्या या निर्णयानंतर मृत तरुणाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि हृदय दान केले. या अवयवांमुळे चार अत्यवस्थ रुग्णांना अवयव मिळाले.

यकृत आणि एक मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णांवर यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील रुग्णासाठी आणि हृदय तातडीने मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल रुग्णावर प्रत्यारोपित करण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून रवाना करण्यात आले.
Maharashtra TimesTukaram Mundhe : शाळेच्या आवारात चॉकलेट, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्सवर बंदी, तुकाराम मुंढे यांचा मोठा आदेश

ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कात्रज-देहूरोड बायपासवर भरधाव ट्रकने पादचाऱ्याला धडक दिल्याने अंदाजे ३० ते ३५ वर्षांच्या अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या चालकाचे नाव विठ्ठल गायकवाड (वय ३८, रा. पुरकी, चिमकी फाटा, चाकण, मूळ रा. किनाळा, जि. नांदेड) असे आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई नागेश कोळी यांनी आंबेगाव पोलिसात तक्रार दिली.
Maharashtra TimesMumbai Crime : आठ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार, चेंबूरमध्ये विकृत मानसिकतेचं भयावह रुप; जगण्याची शाश्वती कमी
२७ जुलैला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात गस्त घालत असलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा