जेनझी आंदोलनानंतर अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रणौत चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौत यांनी तरुणांवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून सोशल मीडियासहित सर्वत्र कंगना रणौत यांना ट्रोल केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर या देखील आक्रमक झाल्या आहेत. ठाकरेंवर टीका केल्याने कंगनाचे प्रमोशन झाले असा खोचक टोला पेडणेकरांनी लगावला. देशातील तरुण वर्गच तिला धडा शिकवणार असा हल्लाबोलही त्यांनी केला.