Tukaram mundhe fda took action against food vendors and seized a stock of suspected food items; तुकाराम मुंढेंनी पुण्यात आता भेसळखोरांचं कंबरडं मोडलं; लाखोंचा साठा नष्ट, ५ हॉटेल परवाने निलंबित
Tukaram mundhe fda took action against food vendors and seized a stock of suspected food items; तुकाराम मुंढेंनी पुण्यात आता भेसळखोरांचं कंबरडं मोडलं; लाखोंचा साठा नष्ट, ५ हॉटेल परवाने निलंबित
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाई करून ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि नियमांचे पालन न करता अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
‘एफडीए’च्या पथकाने गणेश पेठेतील मे. वर्धमान एंटरप्रायझेस येथे तपासणी करून अन्नामलाई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा सात लाख ८२ हजार ९३२ रुपयांचा माल जप्त केला. या पदार्थांवर आवश्यक माहिती नसणे आणि लेबलिंगमध्ये त्रुटी आढळून आल्या. याच परिसरातील मे. न्यू पांडियन एंटरप्रायझेस येथून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा ५८ हजार ६२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
भवानी पेठेतील गुरुनानक हायस्कूलजवळील माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामातून सर्वाधिक माल जप्त करण्यात आला. यामध्ये सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोल असा ३६ लाख ३९ हजार ३८० रुपयांचा साठा आढळून आला. या गोदामात अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचेही तपासणीत समोर आले.
नाना पेठेतील मे. गोयल सेल्स कॉर्पोरेशन येथून काजू, बदाम, मनुका, मटण मसाला आणि मोहरी असा ६९ हजार ८३५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या पदार्थांवर चुकीचे ब्रँडिंग केल्याचा संशय आहे; तसेच नाना पेठेतील मे. विजय लक्ष्मी ट्रेडर्स येथून राईस ‘०’ नंबर शेव आणि फरसाण जप्त करण्यात आले.
विभागातील पाच हॉटेल परवाने निलंबित
सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील पाच हॉटेल, रेस्टॉरंट आणि कँटिनचे परवाने निलंबित करण्यात आले. साताऱ्यातील न्यू सम्राट हॉटेल, हॉटेल केशर आणि हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट; तसेच सांगलीतील मैत्री चायनीज सेंटर आणि हॉटेल ‘२५२० गावरान तडका’ यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कृत्रिम दूध तयार करण्याचा प्रकारही उघडकीस आला. पाच लिटर म्हशीचे दूध आणि भेसळीसाठी वापरले जाणारे ४.४ किलो रिफाइंड पाम ऑइल जप्त करण्यात आले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा