Krishna Andekar Murder Plot : शिवाजीनगर न्यायालयापासून एक बाईक पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत होती. चाकणपर्यंत तीच बाईक मागे असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बाईक अडवण्याचा प्रयत्न केला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मकोका’ गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयात हजर करून कृष्णा आंदेकर ; तसेच त्याचे नातेवाईक स्वराज आणि तुषार वाडेकर यांना कारागृहात नेत असताना त्यांचा खून करण्याचा कट ठोंबरे टोळीने रचल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. कृष्णा आंदेकर हा कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकरचा मुलगा आणि माजी नगरसेवक मयत वनराज आंदेकर याचा भाऊ आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या कृष्णाने एन्काऊण्टरच्या भीतीने आत्मसमर्पण केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय म्हस्केवर दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी कृष्णा आंदेकर, स्वराज आणि तुषार वाडेकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारी त्यांना पुन्हा नंदुरबार आणि धुळे कारागृहात नेण्यासाठी पथक निघाले.
MHT CET Scam Row: Viral Calls 12 ते 15 लाख देऊन Top Govt Engineering College मध्ये Admission ची हमी
शिवाजीनगर न्यायालयापासून एका दुचाकीवरून पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग सुरू करण्यात आला. चाकणपर्यंत तीच दुचाकी पोलिस वाहनाच्या मागे असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दोघेही दुचाकी सोडून पसार झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे वेदान्त आणि अथर्व यांना कात्रज परिसरातून ताब्यात घेतले.
ठोंबरे-आंदेकर टोळीतील संघर्ष तीव्र
वनराज आंदेकरच्या खुनानंतर आंदेकर आणि गायकवाड गटातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. वनराजच्या खुनानंतर आयुष कोमकर आणि गणेश काळे यांची हत्या झाली. त्यानंतर सहकारनगर परिसरात अक्षय म्हस्केवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, आता उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे सूरज ठोंबरे-आंदेकर टोळीतील संघर्ष येत्या काळात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Tukaram Mundhe : कुठे झुरळं कुठे गंजलेली उपकरणं; MIG, CCI सह मुंबईतील नामांकित क्लबवर FDA चे छापे, परवाने निलंबित चौकशीत पोलिस वाहन कुठे आहे, त्याच्यासोबत किती पोलिस आहेत, ताफा कोणत्या मार्गाने जात आहे, याची माहिती दोघे सातत्याने सूरज ठोंबरेला मोबाइलद्वारे देत असल्याचे तपासात उघड झाले. या दोघांकडे पिस्तूल असल्याचाही पोलिसांना संशय असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा