► वृत्तसंस्था लंडन
दिवंगत बॉलिवूड स्टार देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराचा झटक्यामुळे लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देव आनंद यांची नात जीना नारंग यांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या निधनाची पुष्टी केली.
देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद हे एक अभिनेतेही होते. देव आनंद यांनीच आपल्या मुलाला चित्रपटांमध्ये लाँच केले होते. त्यांनी 1984 मध्ये ‘आनंद और आनंद’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला असला तरी त्यानंतर त्यांनी आणखी दोन चित्रपटांमध्येही काम केले, परंतु तेही अयशस्वी ठरले. देव आनंद हे त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. मात्र, त्यांचा मुलगा सुनील फार मोठी कामगिरी करू शकला नव्हता.
