Headlines

Ratnagiri 25 Year Old Girl Death in Accident At Dapoli-Khed Road


दापोली-खेड मार्गावर दुचाकीवरुन जाणाऱ्या मैत्रिणींचा भीषण अपघात झाला. दुचाकी नियंत्रणाबाहेर गेल्याने दोन्ही मैत्रिणी ओढ्यामध्ये पडल्या. या घटनेत एका 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी तरुणी सुदैवाने बचावली आहे.

Ratnagiri News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड राज्यमार्गावर 28 जुलै रोजी मंगळवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात एका युवतीचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. खेडच्या दिशेने निघालेल्या दोन मैत्रिणींच्या दुचाकी गाडीला झालेल्या मोठ्या अपघातात एका पंचवीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेजल संदीप भागवत असं मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

दापोलीहून खेडच्या दिशेने निघालेल्या या दोघी मैत्रिणी आपल्या दुचाकीवरून जात असताना शिरसिंगे फाट्याजवळ अपघाताची घटना घडली. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये पडली. गाडीच्या अपघाताच्या आवाज येताच घटनास्थळापासून जवळ राहणारे प्रशांत पवार आणि काही ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी वैष्णवी चंद्रकांत अहिरे हिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी वैष्णवी हीने माझ्याबरोबर असलेली सेजल दिसत नाही असं ग्रामस्थांना सांगताच ग्रामस्थांनी पाणी असलेल्या ओढ्यात तात्काळ शोधकार्य सुरू केलं. मात्र तोपर्यंत सेजलचा मृत्यू झाला होता.

अपघात नेमका कसा घडला?

गाडीच्या अपघातात दगडावर पडल्याने सेजल हिचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कदाचित दुचाकीच्या पुढे कुत्रा किंवा काही आले असावे आणि त्याला वाचवताना दुचाकीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

शेवटचा पेपर दिल्याने आनंदात होती सेजल

सेजल ही बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला होती. तिने नुकतीच 25 जुलै रोजी आपल्या बीएससी नर्सिंग या कोर्सची लास्ट इयरची एक्झाम दिली होती. सेजल लास्ट इयरची एक्झाम झाल्याने आनंदात होती. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नर्स होण्याचे तिचे स्वप्न होतं. मात्र निष्ठुर नियतीने तिला या अपघातात हिरावून नेल्याने तिचे स्वप्न अधुरे राहिल आहे.

Ratnagiri News

या घटनेने भागवत कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. सेजलही अभ्यासात हुशार विद्यार्थिनी होती. तसेच तिला कला क्षेत्राचीही आवड होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रामराजे महाविद्यालयाची ती नर्सिंगची विद्यार्थिनी होती. या घटनेचे वृत्त कळताच दापोली उपजिल्हा रुग्णालयात दापोली पोलीस तसेच सेजलच्या टेटवली गावातील ग्रामस्थ व रामराजे महाविद्यालयाच्या शिक्षकांनी धाव घेतली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला आहे. सेजल हिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे भागवत कुटुंब व टेटवली परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सेजल हिच्या पश्चात आई-वडील दोन भावंड असं कुटुंब आहे. दापोली पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा