Headlines

Price Hike in August 2026: महागाई पुन्हा येणार! ऐनसणासुदीत दरवाढीची धडकी; चहापासून गाड्या, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक वस्तू महागणार


Price Hike in August 2026: पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, प्रतिकूल हवामान आणि कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीमुळे सर्वसामान्यांना आगामी महिन्यात महागाईचे आणखी चटके बसण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी ग्राहक वस्तू उत्पादक या वर्षी तिसऱ्यांदा ऑगस्टमध्ये किमती वाढवतील.

August 2026 Price Hike Alert
चहापासून गाड्या, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक वस्तू महागणार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऑगस्ट महिन्यापासून देशभरात सणासुदीचा काळ सुरू होईल आणि त्यासोबतच सर्वसामान्यांना आता लवकरच महागाईचे आणखी चटके आणखी जाणवू लागणार आहेत. पुढील महिन्यात सकाळच्या चहापासून ते गाड्यांपर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. साल 2026 मध्ये तिसऱ्यांदा कन्झ्युमर कंपन्या दरवाढ करण्याची तयारी करत असून यावेळी 6 ते 8 टक्के दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे.

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

मध्यपूर्वेत अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या मालाच्या अस्थिर किमती आणि वाढलेले मालवाहतूक दर, तसेच चलनातील चढउतार या हालचालींच्या पार्श्वभूमीवर कन्झ्युमर उत्पादक कंपन्या ऑगस्टमध्ये चालू वर्षातील विविध श्रेणींमधील तिसरी दरवाढ करणार आहेत.

Maharashtra TimesEPF Withdrawal Rules Explained: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफच्या पैशातून घर खरेदी, होम लोन फेडण्यापूर्वी 4 रिस्क लक्षात घ्या, अन्यथा नुकसान होणारच
इकॉनॉमिक टाइम्सच्या उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा हवाला देऊन सांगितले की, पुढील महिन्यापासून पॅकबंद चहा, केसाचे तेल, रेफ्रिजरेटर्स, टीव्ही, कपडे आणि प्रवासी वाहने यांसारख्या विविध उत्पादनांच्या किमतीत 6 ते 8 पर्यंत वाढतील. यासह सणासुदीच्या तोंडावर या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरील भर आणखी वाढेल. रक्षाबंधन, दसरा आणि दिवाळीपूर्वी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सणासुदीच्या आधी महागाईचा करंट

जून 2026 मध्ये किरकोळ महागाई 4.38 टक्क्यांवर पोहोचलेली, जी मे महिन्यात 3.93% होती. या दरम्यान, अन्नधान्याच्या महागाईचा दर 5.32 टक्के झालेला आणि यश महागाईचे आकडे चिंता बनले असून आता ऑगस्टमध्ये ग्राहकांना नक्कीच धक्का बसला असेल.

पश्चिम आशियातील युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमती आणि वाहतूक खर्चामुळे कंपन्यांचा खर्च वाढत असून वाढता उत्पादन, वाहतूक खर्च आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यातील व्यत्यय कंपन्यांना दरवाढ करण्यास भाग पाडत आहेत. याआधी फेब्रुवारी 2026 मध्ये इराण युद्ध सुरू झाल्यापासून मारुती सुझुकीने दुसऱ्यांदा आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवल्या.

Maharashtra TimesTatkal Ticket New Rules: तात्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम, 1 ऑगस्टपासून सर्वसामन्यांची मोठी अडचण दूर होणार; काय आहे नवीन प्रोसेस?

कोणकोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार

  • पॅक-बंद चहा
  • केसाचे तेल
  • रेफ्रिजरेटर
  • टीव्ही
  • वॉशिंग मशीन
  • स्मार्टफो
  • कपडे
  • प्रवासी वाहन

किमती किती वाढणार, काय महाग होणार?

ऑगस्टपासून मारुती सुझुकीने गाड्यांच्या किमतीत 30000 रुपयांपर्यंत आधीच वाढ जाहीर केली आहे. तसेच मारुती व्यतिरिक्त होंडाच्या गाड्याही 1 ऑगस्टपासून महागणार असून मर्सिडीज-बेंझ, टाटा, महिंद्रा या नामचीन ब्रँड्सनी देखील आधीच गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्यापासून वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरच्या किमती 10% हून जास्त वाढल्या असताना टीव्ही टीव्हीच्या महागले आहेत. याशिवाय मेमरी चिप्सच्या किमती वाढल्यामुळे स्मार्टफोन महाग होताना नफा टिकवून देण्यासाठी कंपन्यांना दरवाढ करणे भाग पडत आहे.