गेल्या काही दिवसांपासून अगं आई, अहो आई या मराठी वेब सीरिजची चर्चा सुरू होती. आता ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजच्या निमित्तानं निर्मिती सावंत, रेणुका शहाणे आणि हृता दुर्गुळे यांनी ‘मटा कट्टा’वर संवाद साधला. स्त्री प्रधान भूमिका, ओटीटीचं माध्यम आणि सासू – सून नातं यावर या अभिनेत्रींनी या मुलाखतीत आपली मतं मांडली. सासू-सून, सासू-जावई आणि विहीणबाई या नात्यातील ‘मैत्री’चा पैलू अनुभवायचा असेल, तर तो वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘अगं आई, अहो आई’ या वेब सीरिजमध्ये अतिशय सुंदररीत्या सादर करण्यात आला आहे. पाहा संपूर्ण मुलाखत