नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्यानिमित्त जवळपास साडेपाच हजार कोटींची कामे शहरात सुरू आहेत. सिंहस्थातील पहिली पर्वणी ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०२७ ची डेडलाइन देण्यात आली आहे.
Nashik Accident : अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत १,२२८ कोटी खर्चुन शहरातील २८ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागामार्फत नदीकाठासह शहरात ५९० कोटींचे कामे हाती घेण्यात आली आहेत. २३० कोटी रुपये खर्चुन नदीकाठावर नव्याने घाट निर्माण केले जात आहेत. शहरातील २८ रस्ते पुन्हा खोदले जाऊ नयेत यासाठी गॅस वाहिनी, भुयारी गटार, जलवाहिनी, ड्रेनेज लाइन, ऑप्टिकल फायबर आदींसाठी उपयोगिता नाले (यूटिलिटी डक्ट) तयार केले जात आहेत. परंतु, संबंधित कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. या कामांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सुरक्षात्मक साहित्य गायब सलग आठवडाभरापासून सुरू असलेल्या पुरामुळे नदीपात्रातील ठेकेदारांचे बहुतांश साहित्यदेखील वाहून गेले आहे. पावसामुळे अर्धवट केलेल्या कामांचीही पोलखोल झाली असून, तुटलेल्या अवस्थेतील कामांमुळे गोदावरीचे रूप ओंगळवाणे झाले आहे. त्यातच येथे खोदून ठेवलेले खड्डे, चाऱ्यांमुळे भाविकांचाही जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे येथून वाट काढताना भाविकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
Nashik Rain: धुव्वाधारेनं नाशिक जलमय! 37.6 मिमी पाऊस; जिल्ह्यात दोघे जखमी, 32 घरांची पडझड, 429 नागरिकांचे स्थलांतर
राज्यपाल आज शहरात
नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थानिमित्त जवळपास तीस हजार कोटींची कामे सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण ऐन करण्यासाठी एकीकडे प्रशासकीय पातळीवरून धावपळ सुरू असतानाच आज, मंगळवारी (दि. २८) राज्यपाल जिष्णू देव वर्मा सिंहस्थाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. पावसाळ्यात सिंहस्थाच्या कामांची वाट लागली असताना आणि नाशिककर या कामांमुळे त्रासले असताना प्रशासनाकडून मात्र राज्यपालांसमोर सुंदर चित्रण सादर करण्याची तयारी दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सुरू होती.
पूरग्रस्तांच्या पंचनाम्यांचा प्रारंभ
नाशिक : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील रहिवासी, तसेच व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नेमक्या नुकसानीचा अंदाज यावा याकरिता महसूल प्रशासनाद्वारे नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या पंचनाम्यांसाठी आठवड्याभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसामुळे सिंहस्थाची कामे प्रभावित झाली असली, तरी ही सर्व कामे मुदतीत पूर्ण होणार आहेत. या पावसाचा अभ्यास करून पुढचे नियोजन केले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडाही तयार आहे. –– शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

