Headlines

नाले गाळाने भरलेलेच; एक कोटी कुठे खर्च झाले? लोकांतून सवाल:नालेसफाईवर महानगरपालिकेकडून 1.09 कोटी रुपयांचा खर्च‎




मनपाने प्रमुख २६५ नाल्यांच्या सफाईसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचे कंत्राट िदले होते. प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रमुख नाल्यांची पाहणी केली असता, नाले आजही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेलेच दिसून आले. त्यामुळे एवढा मोठा खर्च नेमका कुठे झाला?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बहुतांश लहान-मोठे नाले गाळाने तुंबलेले असताना बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यंदा १३ वर्षांनंतर प्रथमच नालेसफाईची कामे टेंडरद्वारे कंत्राटदाराकडे देण्यात आली. एवढा मोठा निधी खर्च करूनही नाल्यांची अवस्था पूर्वीसारखीच असल्याने सफाईवर संशय व्यक्त होत आहे. टिळक रोड, मोठी उमरी, जठारपेठ, न्यू तापडीया नगर, बिर्ला गेट, कौलखेड, मलकापूर आदी भागातील नाल्यांमध्ये गाळ साचलेला आहे. तर काही नाल्यांची साफसफाई करताना काढलेला गाळ कंत्राटदाराने नाल्याच्या काठावर तसाच ठेवला. पाच दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समिती बैठकीतही नालेसफाईचा मुद्दा गाजला होता. कंत्राटदाराने केलेल्या कामांची प्रशासनाने पाहणी न करताच कामे पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. सफाई नावालाच झाल्याचा आरोप होत आहे. ^मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार काम अपेक्षित आहे. ज्या नाल्यांची साफसफाई कंत्राटदाराकडून पूर्ण झाली त्या कामाची इंजिनिअरकडून प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. बांधकाम विभागाकडून याबाबत आढावा घेतला जाईल. – डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महानगरपालिका. 100% सफाईचा दावा मनपाने यंदा २६५ प्रमुख नाल्यांच्या साफसफाईसाठी १ कोटी ९ लाखांचा निधी मंजूर केला. या नाल्यांची लांबी ११२ कि.मी. आहे. दुसरीकडे सुमारे ७०० किलोमीटर लांबीचे लहान, मध्यम नाले स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहेत. स्वच्छता विभागाने शंभर टक्के नालेसफाईचा दावा केला. प्रत्यक्षात किती नाले स्वच्छ झाले, याची आकडेवारी मागितली असता स्वच्छता विभागाकडे कुठलेच आकडे नाहीत. बांधकामकडून आढावा घेणार खर्च करूनही काय फायदा? ^मनपा दरवर्षी नालेसफाईवर लाखो रुपये खर्च करते. यंदा एक कोटींहून अधिक निधी खर्च झाला. मात्र अनेक मोठे नाले अजूनही गाळाने भरलेले आहेत. लहान नाल्यांची स्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे एवढा खर्च करून काय फायदा झाला. पावसाळ्यात घरात पाणी शिरणार असेल तर नालेसफाईला काय अर्थ . – नीलेश देव, नगरसेवक तथा गटनेता, वंचित बहुजन आघाडी.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत