Headlines

कोल्हापूर, सांगलीसाठी 3,200 कोटींचा आराखडा:सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती, नागरिकांना दिलासा




कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या पुराच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३,२०० कोटी रुपयांच्या पूर व्यवस्थापन मोहिमेची घोषणा केली. महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश पावसाच्या पाण्याची साठवणूक वाढवणे आणि कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे हा आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि जागतिक बँकेने मिळून एमआरडीपीअंतर्गत पूर्वतयारी आणि प्रक्रिया पूर्ण केली आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक वाढवून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवून तसेच पावसाचे पाणी वाहून नेणारी ड्रेनेज (निचरा) व्यवस्था मजबूत करून कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीला पुरापासून दीर्घकालीन संरक्षण देण्याच्या दृष्टीने ही ३,२०० कोटी रुपयांची मोहीम एक मोठे पाऊल आहे, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची पुढील पावले वेगाने उचलण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे ते म्हणाले. अनेकदा पावसाळ्यात उद्भवते पूरस्थिती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात अनेकदा भयंकर पूरस्थिती निर्माण होते. या दोन्ही जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे बहुतांश वेळा ही परिस्थिती उद्भवत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा आरखडा तयार करण्याची मागणी होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत