Headlines

आता कसा जागेवर आला! ‘भारताच्या दोन खेळाडूंमुळे हरलो’; पहिल्या मॅचमध्ये पिचला नाव ठेवणाऱ्या सिकंदरने आता कोणाची नावे घेतली


Sikander Raza Marathi News : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसऱ्या सामन्यातही झालेल्या पराभवानंतर सिकंदर रझा याने भारताच्या दोन खेळाडूंना जबाबदार ठरवले आहे. भारताने पहिल्या सामन्यात हरवल्यावर पठ्ठ्याने खेळपट्टीला जबाबदार ठरवलं होतं, पण आता मात्र त्याने पराभव मान्य केला. कोणत्या खेळाडूंची नावे घेतली जाणून घ्या.

Sikander Raza on Team india
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध एकही टी-२० लढत न जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही एकतर्फी वर्चस्व राखले. ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २१९ धावांचा डोंगर उभारला आणि तिथेच सामन्याचा निकाल जवळपास निश्चित झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला १२९ धावांत रोखत सहज विजय मिळवला आणि मालिकाविजयाची अपेक्षित पूर्तता केली. पहिल्या सामन्यामध्ये खेळपट्टीवर पराभवाचं खापर फोडणारा झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने आता पराभव स्वीकारला असून दोन खेळाडूंना व्हिलन ठरवले आहे.

सिकंदर रझा काय म्हणाला?

आमच्या गोलंदाजांनी काही टप्प्यांवर चांगली गोलंदाजी केली, परंतु भारताच्या फलंदाजांनी आज जे फटके मारले आणि जे कौशल्य दाखवले ते नक्कीच वाखाणण्याजोगे होते. ईशान सध्या खूप चांगल्या लयीत आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आव्हानात्मक असते, पण त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने आणि तिलकने मिळून केलेली फलंदाजी अप्रतिम होती आणि त्यांच्या कौशल्यातून आम्ही नक्कीच काहीतरी शिकू शकतो. भारतीयांच्या या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन पुढील सामन्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असं सिकंदर रझा याने म्हटलं आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM 2nd T20 : झिम्बाब्वेला लोळवलं पण भारताला विजयानंतर एक वाईट बातमी, कॅप्टन अय्यरही टेन्शनमध्ये, नेमकं काय झालं?
कर्णधार म्हणून माझ्या फलंदाजीमुळे मी संघाला निराश करत आहे असे मला वाटते. ही चूक सुधारण्याची जबाबदारी माझी आहे कारण संघाला माझ्या धावांची गरज आहे. दुर्दैवाने गेल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये तसे घडलेले नाही. पण, मी परिस्थिती बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, असंही रझाने म्हटलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार यानेही बोलताना ईशान किशन आणि तिलक वर्मा यांचे कौतुक केले.
Maharashtra Timesind VS zim 2ND T20 : झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत भारताकडे विजयी आघाडी, अभिषेक शर्माच्या 3 विकेट; कोणी फिरवली मॅच?
भारतीय संघाच्या या एकतर्फी विजयात संघातील प्रत्येक खेळाडूचा सहभाग होता. आम्ही १८० धावांची अपेक्षा केली होती; मात्र ईशान किशन आणि तिलक वर्माने आमच्या अपेक्षांपेक्षा जास्त धावा करून दिल्या. त्यामुळे आम्ही २२० धावा करू शकलो. त्यांची फलंदाजी खेळाचा आनंद देणारी होती. सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यापूर्वीच्या कामगिरीचा विचार न करता, कोणतीही धास्ती न बाळगता मैदानात उतरणे महत्त्वाचे असते. प्रत्येक संधीचा किती फायदा घेतला जातो, ते निर्णायक असते, असं श्रेयस अय्यर म्हणाला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा