LIC Smart Pension Plan: सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही एलआयसी पेन्शन योजना फायदेशीर ठरू शकते. एकरकमी गुंतवणुकीमुळे आयुष्यभराच्या पेन्शनची हमी मिळते.
एलआयसी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दरमहा 20000 मिळवण्याची हमी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नोकरीतून रिटायर झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला आरामदायी आयुष्य जगायचं असतं. वृद्धापकाळात आर्थिक गरजांसाठी कोणाकडे हात पसरावे लागू नये यासाठी प्रत्येकजण पैशाची बचत करण्यासाठी आणि परतावा मिळवण्यासाठी एका विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात असतो. तुम्ही रिटायरमेंटची प्लॅनिंग करत असाल आणि त्यासाठी दर महिन्याच्या हमी पेन्शन योजनेच्या शोधात असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळाची – एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना- तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेतून कोणत्याही व्यत्ययाशिवाय निश्चित पेन्शनची हमी मिळते.
एलआयसीच्या या पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य काय
‘इमिजिएट ॲन्युइटी’ मॉडेल एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. म्हणजे, तुम्हाला पेन्शनसाठी रिटायरमेंटपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. या योजनेत तुम्ही एकरकमी रक्कम जमा करताच पुढच्याच महिन्यात तुमची पेन्शन तुमच्या बँक खात्यात जमा होणे सुरू होईल. दरमहिन्याला उत्पन्न हवं आहे अशा लोकांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.
एलआयसीने 2025 मध्ये ही पेन्शन योजना सुरू केलेली, ज्यामध्ये लोकांना गुंतवणूक आणि पेन्शन या दोन्हीचे फायदे मिळतात. म्हणजे, सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना एक तात्काळ ॲन्युइटी योजना आहे, जी पॉलिसीधारकांना एकच प्रीमियम भरल्यानंतर लगेचच पेन्शन मिळवण्यास सुरुवात करण्याची सुविधा देते आणि आयुष्यभर सुरू राहते.
एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत एकरकमी गुंतवणूक अनिवार्य असून ही योजना पूर्णपणे नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग आहे. म्हणजे, शेअर बाजारातील तेजी किंवा घसरणीचा तुमच्या पेन्शनवर किंचितही परिणाम होणार नाही तर, पॉलिसी खरेदीच्या वेळी एकदा पेन्शनचा दर निश्चित झाल्यावर कंपनी तुम्हाला आयुष्यभर तितकेच पैसे पेन्शन म्हणून देत राहील.
पती-पत्नी सिंगल किंवा संयुक्त या योजनेत गुंतवणूक करू शकतात
मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनचे पर्याय
दरवर्षी पेन्शनमध्ये 3% किंवा 6% वाढ करण्याचा पर्याय मिळतो
NPS अंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्यांना विशेष लाभ मिळतात
मृत्यूनंतर गुंतवणुकीची रक्कम परत मिळवण्याचा पर्याय.
स्मार्ट पेन्शन योजनेअंतर्गत किमान ॲन्युइटी खरेदीची रक्कम 1 लाख रुपये असून कमाल मर्यादा निश्चित नाही, म्हणजे जितकी गुंतवणूक जास्त तितकंच तुम्हाला जास्त पेन्शनचा फायदा मिळेल. लक्षात घ्या की एलआयसीची ही पेन्शन योजना विशेषतः सेवानिवृत्त कर्मचारी, खाजगी कर्मचारी आणि नियमित दरमहिना उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे.
याशिवाय प्रत्येक पॉलिसीधारकाच्या मनात प्रश्न असतो की आपल्या पश्चात आपल्या पैशांचे काय होईल? एलआयसीने ही भीती पूर्णपणे दूर केली आहे, कारण पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर संपूर्ण मूळ रक्कम (ॲन्युइटी किंमत) नॉमिनीला परत केली जाते.
तुम्हाला आता दरमहिन्याला 20,000 रुपये पेन्शन हवी असेल तर, किमान या योजनेत किमान 35 लाखांची गुंतवणूक अनिवार्य आहे. या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 2.87 लाख परतावा आणि 23,940 रुपये मासिक पेन्शन मिळेल. वरील कॅलक्युलेशन आहे आणि तुमच्या वय व पर्यायानुसार प्रत्यक्ष रकमेत किंचित फरक असू शकतो.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा