SCLR Extension: मुंबई विद्यापीठामार्गे वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत जोडणाऱ्या, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्ताराचं बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
मुंबई: शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्गापासून ते वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत सिग्नल फ्री कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा विस्तार करून तो मार्ग वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत जोडण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठामार्गे जाणाऱ्या या रस्त्याचं बहुतेक काम आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे या परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पूर्व ते पश्चिम प्रवास
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील या उन्नत कनेक्टरमुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हीटी सुधारणार आहे. पश्चिम उपनगरांतून प्रवास करणाऱ्यांना एक पर्यायी मार्ग उपलब्ध करून देऊन शहरातील सर्वाधिक कोंडी असलेल्या मार्गांवरील वाहनचालकांचा प्रवास सुखद होणार आहे. यामुळे सिग्नल-मुक्त कनेक्टटिव्हीटी निर्माण होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलाला सहजपणे पूर्व आणि पश्चिम उपनगरांशी जोडता येणार आहे. तसेच, सांताक्रूझ, वाकोला, कलानगर, कलिना, कुर्ला आणि चेंबुरसारख्या भागांमधील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
हा विस्तारलेला भाग १.४ किलोमीटर लांब आहे. या भागाचं काम ऑक्टोबर २०१७मध्ये सुरू झाला असून आता पूर्ण होणार आहे. या बांधकामासाठी एकूण २०९.५६ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यापैकी १४८ कोटी रुपये खर्च करून उन्नत पूल बांधला आणि ६१.५६ कोटी रुपयांना वाकोला पुलासह इतर कामं करण्यात आली. पहिल्या टप्प्यात बीकेसीमधून येणाऱ्या वाहनांना थेट कुर्ला आणि एससीएलआरकडे जाण्यासाठी मार्ग मिळमार आहे. या विस्तारीकरणात नाल्यावरून जाणारा कुर्ला ते वाकोला एक भव्य केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.
या मार्गामुळे सीएसटी रोज, कुर्ला स्थानक परिसर आणि वाकोला सिग्नलवरील प्रचंड वाहतूककोंडीचा ताण कमी होणार आहे. १५-२० मिनिटांचा प्रवास अवघ्या ५-८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. बीकेसी, भारत डायमंड बोर्स आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणऱ्या प्रवाशांना थेट उन्नत मार्ग मिळणार आहे.
सांताक्रूझ-चेंबूर लिंर रोडचं नियोजन जागतिक बँकेच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत २००३ मध्ये करण्यात आलं होतं. नंतर एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी द्वारे हा प्रकल्प साकारण्यात आला. भारतातील पहिला दुमजली उड्डाणपूल या लिंक रोडवर बांधण्यात आला. टिळक नगर ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान असलेला हा सहा पदरी पूल एक इंजिनियरिंग मार्वेल मानला जातो. पण प्रकल्पाचं काम पूर्ण करताना अनेक अडथळे आले. जमीन संपादन, झोपडपट्टी पुनर्वसन आणि मध्य रेल्वेच्या रुळांवरून गर्डर टाकण्याच्या कामामुळे प्रकल्पाला ११ लागले. त्यानंतर १८ एप्रिल २०१४ रोजी मुख्य ६.४५ लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे चेंबूर ते सांताक्रूझ प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून १५-२० मिनिटांवर आला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा