Headlines

आंदोलन जाहीर करण्याआधी पोलीस परवानगी घेणे सक्तीचे


त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : कोणतीही आंदोलने सोशल मीडियावर जाहीर करण्यापूर्वी पोलीस दलाची परवानगी घेणे सक्तीचे आहे. परवानगी घेण्याआधीच जाहीर केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे अप्रिय घटना घडल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. यासंबंधी शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्तांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.

सध्या वेगवेगळ्या संघटना व व्यक्ती वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलने हाती घेत आहेत. एखाद्या आंदोलनाविषयी सोशल मीडियावर माहिती जाहीर करण्याआधी पोलीस दलाची परवानगी घेणे सक्तीचे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मदतीचे ठरणार आहे. परवानगी न घेताच जाहीर होणाऱ्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबरोबरच कायदा व सुव्यवस्था परिस्थितीलाही धक्का पोहोचू शकतो.

पोलीस दलाची परवानगी घेण्याआधीच सोशल मिडियावर आंदोलन जाहीर करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. अशा आंदोलनात भाग घेणाऱ्यांपासून एखादी अप्रिय घटना घडल्यास संबंधितांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत