Headlines

iQOO चा 20 हजारांपेक्षा कमी बजेटमधील 5G स्मार्टफोन बाजारात; खरेदीवर मिळणार 1,500 चा थेट डिस्काउंट । Maharashtra Times


मिड-रेंज बजेटमध्ये नवीन मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी ‘iQOO Z11 Lite 5G’ हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनवर ग्राहकांना 1,500 चा इन्स्टंट बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे, ज्यामुळे हा फोन अधिक किफायतशीर दरात खरेदी करता येईल. चला तर मग iQOO Z11 Lite 5G या फोनविषयी जाणून घेऊया.

iQOO Z11 Lite 5G । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा. iQOO Z11 Lite 5G या फोनमध्ये 1200 निट्सची पीक ब्राइटनेस असणारा शानदार डिस्प्ले आणि आधुनिक AI फीचर्स देण्यात आले आहेत. उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या या 5G स्मार्टफोनची अधिकृत विक्री पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून, ग्राहकांना हा मोबाईल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सहज खरेदी करता येणार आहे.

iQOO ने iQOO Z11 Lite 5G स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेला हा लेटेस्ट 5G फोन कंपनीच्या Z10 Lite 5G ची अपग्रेडेड व्हर्जन आहे. हा फोन मिडनाइट ब्लू आणि सोलर फ्लेम या दोन रंगात लाँच करण्यात आला आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, iQOO Z11 Lite 5G हा फोन तुम्हाला AI पावर्ड फीचर्स, मोठी बॅटरी आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्लेसह मिळेल. याशिवाय हा हँडसेट 3 रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये AI कॅप्शन आणि AI क्रिएशन सारख्या फीचर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे.

iQOO Z11 Lite किंमत भारतातील

4 GB रॅम आणि 128 GB व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये, 6 GB रॅम आणि 128 GB व्हेरिएंटची किंमत 21,499 रुपये आणि 6 GB रॅम आणि 256 GB व्हेरिएंटची किंमत 24,499 रुपये आहे. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, हे व्हेरिएंट अनुक्रमे 17,999 रुपये, 19,999 रुपये आणि 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध असतील.

लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, ॲक्सिस बँक आणि एसबीआय कार्ड व्यवहारांवर 1500 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे, याशिवाय तीन महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय सुविधा दिली जात आहे. फोनची विक्री 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कंपनीची साइट, ॲमेझॉन, विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि काही खास रिटेल आउटलेट्सवर सुरू होईल.

iQOO Z11 Lite 5G स्पेसिफिकेशन्स

  • प्रोसेसर: हा मिड-रेंज फोन मीडियाटेक डायमेंशन 6300 चिपसेटचा वापर करतो, त्याचा AnTu स्कोअर 5,79,000 पेक्षा जास्त आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 6500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्याचा दावा केला गेला आहे की बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 80 तासांपर्यंत सतत म्युझिक प्लेब्लॉक देते. याशिवाय हा फोन 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो, याशिवाय या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंग 2.0 सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
  • फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा सोनी प्रायमरी सेन्सर, 0.08 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • डिस्प्ले: फोनमध्ये 6.74 इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले आहे, हा हँडसेट तुम्हाला 1200 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह मिळेल.
  • रॅम: 6 GB रॅमसह 6 GB व्हर्च्युअल रॅम तसेच 256 GB इंटरनल स्टोरेज आहे.
शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा