मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games) क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामधील भारत-पाक सामन्याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जपानमधील आइची-नागोया येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. बीसीसीआयने याआधीच महिला आणि पुरूष संघांची घोषणा केलीय. दोन्ही संघांनी मागील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यंदाचा भारत-पाक सामना केव्हा होणार याची तारीख काय याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. भारत-पाक सामना होण्यासाठी समीकरण नेमकं कसं असणार जाणून घ्या.
पुरुष क्रिकेट स्पर्धा ही २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना १ ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या 4 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे चारही संघ थेट उपांत्यपूर्व फेरी खेळतील. उरलेल्या ४ जागांसाठी ६ संघांमध्ये पात्रता सामने होतील. दोन गट पाडले असून अ गटात अफगाणिस्तान, जपान, नेपाळ आणि ‘ब’ गटात हाँगकाँग, मलेशिया, ओमानया संघ आहेत. यामधील चार संघ हे उपांत्यपूर्व फेरीमध्ये जाणार आहे. IND vs ZIM : अरे काय रे! भारताने झिम्बाब्वेवर एकहाती विजय मिळवला, पण कॅप्टन सिकंदरने दिलं भलतंच कारण; मॅच झाल्यावर काय म्हणाला? महिला क्रिकेट स्पर्धा ही १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. भारतीय महिला संघालाही थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश दिला आहे. भारत आणि जपानसोबत सामना असणार असून पुढे विजेता संघ उपांत्य फेरीत बांगलादेश किंवा चीनशी भिडेल. इतर सामने हे श्रीलंका मलेशियासोबत आणि पाकिस्तान हा थायलंडविरूद्ध भिडतील. Sachin Tendulkar : शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी. कमलिनी (विकेटकीपर), भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका रेड्डी, कुमारी गाडे पाटील, राधा यादव आणि नंदनी शर्मा.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा