Headlines

आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे शेड्यूल जाहीर! भारत-पाक महामुकाबला होणार पण एका अटीवर, दोन्ही संघांना जिंकावं लागणार; समीकरण जाणून घ्या


मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games) क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामधील भारत-पाक सामन्याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जपानमधील आइची-नागोया येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. बीसीसीआयने याआधीच महिला आणि पुरूष संघांची घोषणा केलीय. दोन्ही संघांनी मागील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यंदाचा भारत-पाक सामना केव्हा होणार याची तारीख काय याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. भारत-पाक सामना होण्यासाठी समीकरण नेमकं कसं असणार जाणून घ्या.

पुरुष क्रिकेट स्पर्धा ही २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना १ ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या 4 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे चारही संघ थेट उपांत्यपूर्व फेरी खेळतील. उरलेल्या ४ जागांसाठी ६ संघांमध्ये पात्रता सामने होतील. दोन गट पाडले असून अ गटात अफगाणिस्तान, जपान, नेपाळ आणि ‘ब’ गटात हाँगकाँग, मलेशिया, ओमानया संघ आहेत. यामधील चार संघ हे उपांत्यपूर्व फेरीमध्ये जाणार आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM : अरे काय रे! भारताने झिम्बाब्वेवर एकहाती विजय मिळवला, पण कॅप्टन सिकंदरने दिलं भलतंच कारण; मॅच झाल्यावर काय म्हणाला?
महिला क्रिकेट स्पर्धा ही १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. भारतीय महिला संघालाही थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश दिला आहे. भारत आणि जपानसोबत सामना असणार असून पुढे विजेता संघ उपांत्य फेरीत बांगलादेश किंवा चीनशी भिडेल. इतर सामने हे श्रीलंका मलेशियासोबत आणि पाकिस्तान हा थायलंडविरूद्ध भिडतील.
Maharashtra TimesSachin Tendulkar : शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी. कमलिनी (विकेटकीपर), भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका रेड्डी, कुमारी गाडे पाटील, राधा यादव आणि नंदनी शर्मा.