Nashik News: नाशिकमध्ये गुरुवारी नाशिक बंदची हाक पुकारली गेली. जंतर मंतर येथे होणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत हे आंदोलन केलं. आंदोलनाला संबोधित करताना विद्यार्थ्यांवर शासनाकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला गेला.

सरकारच्या हुकूमशाही विरोधात घोषणाबाजी
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीआयपी) प्रमुख नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात लाल झेंडे आणि निळे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात आणि पोलिसांच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ऐन पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम
आंदोलनाला संबोधित करताना नेत्यांनी सांगितले की, दिल्लीत आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर शासनाकडून होणारा अत्याचार अत्यंत संतापजनक आणि लोकशाहीचा गळा घोटणारा आहे. शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. ऐन पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. नाशिककरांनीही या बंदला पाठिंबा दर्शवत आपला निषेध नोंदवला.
नाशिक बंदचे पडसाद देवळाली गावातही उमटले
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या‘नाशिक बंद’चे पडसाद देवळाली गावातही तीव्रतेने उमटले. शालीमार येथील मुख्य आंदोलनासोबतच देवळाली गावातही सामाजिक संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. ऐन मुसळधार पावसातही देवळाली गावातील बाजारपेठ आणि मुख्य रस्ते शांत होते. वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि इतर डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिसरात निदर्शने केली.
Pune FDA Raid :’एफडीए’ची कारवाई ; १२ हॉटेलचे परवाने निलंबित
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
सध्या दिल्ली मध्ये जंतर मंतर येथे सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद हे राज्यात चांगल्याच पद्धतीने उमटताना दिसतायत.राज्यातील प्रत्येक शहरातून, गावातून आंदोलनासाठी पाठिंबा दर्शवला जातोय. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडी ,डावे पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी . विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाशिक बंदीची हाक पुकारली.
जिल्ह्यातून मिळाला संमिश्र प्रतिसाद
या नाशिकच्या बंदच्या पुकाराला जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुसळधार पावसातही नीटप्रश्नी नाशिक जिल्ह्यातून जंतर मंतर येथील विद्यार्थांना पाठिंबा दर्शवला गेला.

