Headlines

Ranjana Deshmukh : अपघातानं अपंगत्व आलं, तरीही नाही मानली हार; रंजना देशमुख यांनी व्हिलचेअरवर बसून नाटकात केलेलं काम


Ranjana Deshmukh : रंजना देशमुख यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण एका अपघाताने त्यांना अपंगत्व आलेलं. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि नाटकात काम केलेलं.

Ranjana Deshmukh Life Changed After Accident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांनी अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. रंजना यांची आई वत्सला देशमुख यासुद्धा अभिनेत्री होत्या. त्यांनीही हिंदी आणि मराठी सिनामांमध्ये काम केलं आहे. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या सिनेमातून रंजना यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. रंजना यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. अशोक सराफ यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप गाजली. मात्र, एक अपघात झाला आणि सारं काही बदललं. पण, तरीही रंजना यांनी हार मानली नाही. अपंगत्व येऊनही त्यांनी एका नाटकात काम केलेलं.

जिद्दीनं रंगभूमीवर केलेलं पुन्हा पदार्पण

१९८७ मध्ये बंगळुरुला एका सिनेमाच्या शुटिंगसाठी जात असताना रंजना देशमुख यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघतात त्यांना गंभीर दुखापत झाली. रंजना यांची एक बाजू पॅरालाईज झाली आणि त्या अंथरुणाला खिळल्या. मात्र, नंतर जिद्दीनं रंजना यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं. ‘फक्त एकदाच’ या नाटकात त्यांनी काम केलेलं.
Maharashtra TimesMehmood : ‘सुपरस्टार असशील तुझ्या घरी’, मेहमूद यांनी संपूर्ण सेटसमोर राजेश खन्ना यांच्या लगावलेली कानशि‍लात, दिलेली तंबी; काय घडलेलं?
‘फक्त एकदाच’ या नाटकात सुपरस्टार अभिनेत्री अपघातात आपलं सारं काही गमावते, असं दाखवण्यात आलेलं. त्यामुळे हे नाटक रंजना देशमुख यांची शोकांतिका होती. या नाटकामध्ये रंजना व्हिलचेअरवर बसून काम करायच्या. हे नाटक रंजना देशमुख यांच्यावरच आधारित असल्याचं म्हटलं गेलं. पण, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से

रंजना यांच्याबद्दल काय म्हणालेले अशोक सराफ?

एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ रंजना देशमुख यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘रंजना देशमुख खूप चांगली नटी होती. खूप मेहनती होती. एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे काय? मी हे करून दाखवणारच. मला हे यायलाच पाहिजे, असं तिचं असायचं. ती मला फॉलो करायची, हे तिनंच मला सांगतिलं होतं. मी तुला बघते आणि काम करते. माझ्यासोबत काम केल्यानंतरचे तिचे रोल बघा. पण, तिच्याकडे शिकण्याची खूप जिद्द होती. त्यामुळे ती ते करू शकली.’
Maharashtra TimesShivani Rangole : ‘हिंदू की मुस्लीम, कोणत्या पक्षाला पाठिंबा देताय, हे सांगण्याची वेळ नाही’ NEET पेपरफुटीबद्दल शिवानी रांगोळे स्पष्टच बोलली
रंजना देशमुख यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘बिन कामाचा नवरा’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘असला नवरा नको गं बाई’, ‘एक डाव भुताचा’, ‘कशाला उद्याची बात’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलंय. दरम्यान, रंजना देशमुख यांचं ३ मार्च २००० रोजी परेल येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा