CJP Protest Student helped by Doctors : तरुण निवासी डॉक्टरांपासून वैद्यकीय तज्ज्ञ देशाच्या कानाकोपऱ्यातून या तरुण मुलांना वैद्यकीय मदत, मानसिक समुपदेशनाचा आधार, औषधांची उपलब्धता अशा विविध पातळ्यांवर सहकार्य करत आहे

डॉक्टरांचा युवावर्गाला दिलासा
तरुण निवासी डॉक्टरांपासून क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञ देशाच्या कानाकोपऱ्यातून या तरुण मुलांना वैद्यकीय मदत, मानसिक समुपदेशनाचा आधार, औषधांची उपलब्धता अशा विविध पातळ्यांवर सहकार्य करत आहे. उपचार करत असलेल्या डॉक्टरांना मार्गदर्शन, स्थानिक आरोग्य संघटनाच्या मदतीने औषधांची उपलब्धता, धक्का बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशानाची सुविधा उपलब्ध केली. मुंबईसह महाराष्ट्र, प. बंगाल, कोलकाता, बेंगळुरू, हैद्राबाद, दिल्ली, लखनऊ येथील डॉक्टरांनी दिलासा दिला.
‘महाराष्ट्र टाइम्स’ने देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या या डॉक्टरांनी मदतीची ही फळी कशी उभी केली याची माहिती घेतली, तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान, चोख नियोजन व स्थानिक नेटवर्क, समुपदेशनाच्या सुविधा यांची योग्य सांगड घालून तरुणांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केल्याचेे दिसले.
Sanjay Ghadi : राणीच्या बागेतील रिकामा बंगला द्या, उपमहापौरांची मागणी धुडकावली, संजय घाडींची अश्विनी भिडेंवर नाराजी
अडीचशेहून अधिक डॉक्टरांचे नेटवर्क रात्रीत तयार
वर्धा सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. आकृती ही मूळची दिल्ली येथील रहिवासी. तिने तसेच डॉ. ऐश्वर्या रवी हिच्यासह अडीचशेहून अधिक डॉक्टरांचे नेटवर्क रात्रीत तयार केले. निवासी डॉक्टरांनी उपचार देत असताना नेमकी दिशा समजून घेण्यासाठी देशाच्या प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापकांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत जोडून घेतले आहे. टेलीमेडिसीनच्या माध्यमातून विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक शंकाकुंशकांना हे तज्ज्ञ एका क्षणाचा अवधी न लावता उत्तर देत आहेत.
Manoj Jarange | कॉकरोच जनता पार्टीच्या व्यासपीठावरून जरांगे कडाडले,’तर सरकार आंदोलन मोडून काढेल’
स्वयंसेवकांना वैद्यकीय शिबिरामध्ये येण्यासाठी मदत
डोक्याला मार लागलेल्या, जखमा असलेल्या, अश्रूधुरामुळे श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या, छातीत दुखत असलेल्यांना स्थिर कसे करायचे या प्रश्नांचे शंकानिरसन डॉक्टरांनी केले. आंदोलनाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत कशी पोहोचवायची यासाठी तयार केलेल्या रिल्समुळे स्वयंसेवकांना वैद्यकीय शिबिरामध्ये येण्यासाठी मदत मिळाली. खासगी वाहनांच्या माध्यमातून औषधे, सलाइन, वेदनाशामक गोळ्या, मलमे, इंजेक्शनची उपलब्धता आंदोलनस्थळी करण्यात आली.
‘ज्यांना रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले, त्यांना मदत करताना संवेदनशीलता असावी यासाठीही डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. नेटवर्कची अडचण असली तरीही व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टरांनी संपर्कात आलेल्या प्रत्येक जखमींना मदत करण्याची धडपड सुरू ठेवली आहे’, असे तेथे असलेले कोलकाता येथील डॉ. एन. पी. नायर यांनी सांगितले.
Divija Fadnavis : सोशल मीडिया ट्रेण्डचं आंधळं समर्थन करु नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीची CJP आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया
रक्तस्राव, मणक्याला दुखापत
लाठीमारामुळे रक्तस्राव, मारहाणीमुळे पोटात पाठीत तीव्र वेदना, मणक्याला दुखापत, हातपाय फ्रैक्चर होणे, अश्रूधुराच्या वापरामुळे धुसर दिसणे, स्पष्ट ऐकू न येणे, अशा तक्रारी दिसत आहे. प्रत्येक जखमेची नोंद करण्याचे आवाहनही आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांना करण्यात येत आहे.
मुंबईतूनही सहकार्य
दिशा संघटनेच्या सदस्य डॉ. पूजा विजय यांनी मुंबईसह दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची वैद्यकीय मदत हवी आहे, यावर लक्ष देत समन्वय करत असल्याचे सांगितले. ‘विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या जखमा झाल्या आहेत, त्यावर कोणते वैद्यकीय उपचार केले
उपलब्धता, जात आहे याच्या नोंदीही काही डॉक्टर ठेवत आहेत. वैद्यकीय साधनांची आंदोलनाच्या ठिकाणी डॉक्टरांची टीम तयार ठेवणे, रुग्णालयामध्ये दाखल करेपर्यंत जखमींना सोबत करणे सुरू आहे’, असे हैदराबादच्या डॉ. सुहास एम. यांनी सांगितले.

