Raj Thackeray Uddhav Thackeray Press Conference on CJP Protest Dharmendra Pradhan Narendra Modi; सरन्यायाधीशांनी झुरळांना जन्म दिला, मग पोरांकडे लक्ष द्यायला नको? राज ठाकरे चिडले, प्रधान-पंतप्रधानांना हटवण्याची मागणी
Raj Thackeray Uddhav Thackeray Press Conference on CJP Protest Dharmendra Pradhan Narendra Modi; सरन्यायाधीशांनी झुरळांना जन्म दिला, मग पोरांकडे लक्ष द्यायला नको? राज ठाकरे चिडले, प्रधान-पंतप्रधानांना हटवण्याची मागणी
Raj Thackeray And Uddhav Thackeray Press Conference: सरन्यायाधीशांनी विद्यार्थी आंदोलनातील व्हिडिओ पाहायला वेळ नसल्याचं सांगितल्यावरुन निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की ‘यांनी झुरळांना जन्म दिला, मग पोराकडे बघायला नको का?’
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : देशभरात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरेसेना आणि मनसेकडून रविवार २६ जुलै रोजी सकाळी दहा वाजता मुंबईत विद्यार्थ्यांसह शक्तिप्रदर्शन मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. सरन्यायाधीशांनी विद्यार्थी आंदोलनातील व्हिडिओ पाहायला वेळ नसल्याचं सांगितल्यावरुनही राज ठाकरेंनी निशाणा साधला. ‘झुरळांना जन्म दिला, मग पोराकडे बघायला नको का?’ असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
राज ठाकरे काय म्हणाले?
“आता हा विषय प्रधानांपुरता मर्यादित राहिला नाही, तर पंतप्रधानांपर्यंत गेला आहे. अनेक आंदोलनांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हा कुठला सत्तेचा माज आहे? नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट-त्रास हे लागतात, हे विचारा. माझा जुना व्हिडिओ पाहा, तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणालो होतो, की आज शेतकरी आत्महत्या करत आहेत उद्या विद्यार्थी करतील, दुर्दैवाने ते खरं ठरत आहे. ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसली नाहीत, त्यांच्याही आई वडिलांना त्रास होत आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
२६ जुलै रोजी विद्यार्थ्यांसह शक्तिप्रदर्शन मोर्चा काढणार आहोत. ठाकरे बंधूंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षालाही सहभागासाठी निमंत्रण दिलं आहे. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार असून, देवाला साकडं घालणार की सरकारला सुबुद्धी दे, असं राज ठाकरे म्हणाले.
सरन्यायाधीशांवर ताशेरे
“सरन्यायाधीशांचा व्हिडिओ पाहिला की आंदोलकांचे व्हिडिओ पाहायला वेळ नाही, त्यांनीच झुरळांना जन्म दिला. जन्म दिला मग पोराकडे बघायला नको?” असा सवाल राज यांनी विचारला.
“आंदोलनात सहभागी झाल्यास खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी पोलीस विद्यार्थ्यांना देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. ब्लॅकमेल करणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ आयुक्तांना पाठवणार आहे, असंही ते म्हणाले. यांनी चुका केल्या की राजकारण नाही करायचं, हे विरोधात गेले की राजकारण, असं कसं?” असं राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“मी जंतरमंतरला गेलो, तिथे एक मध्यमवयीन तरुण होता. तो म्हणाला, की माझा व्यवसाय नीट सुरु होता, पण नोटबंदीने वाटोळं झालं. गेल्या काही वर्षातील राग उफाळून आला आहे. न्यायालयाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. दिल्लीत मुलींचे कपडे फाडले, लाठ्यांना गंजलेले खिळे लावून डोकं फोडलं. सरकारला कबुतर कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे, कॉक्रोचकडे पाहायला वेळ नाही” अशी नाराजी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटला अर्थ नाही. त्यांनी येऊन बोलायला पाहिजे होतं. हा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापुरता विषय नाही, लोकांना सरकार नकोय. सिद्धिविननायकाला साकडं घालणार की सरकारला सुबुद्धी दे किंवा सरकारच बदल. पहिल्या दिवशी चर्चेला बोलावलं असतं तर आंदोलन ताणलं गेलं नसतं. अनेक वर्षांचा असंतोष उफाळून आला आहे, त्याला आम्ही वाट करुन देतोय” असंही उद्धव म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा