Headlines

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीला प्रति पंढरपूर दर्शनाला जाताय? 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्त्यावर NO ENTRY, पर्यायी मार्ग कोणते?


Chhatrapati Sambhajinagar–Pune highway Traffic change: पुणे, अहिल्यानगरकडून धुळे, नाशिककडे जाणारी हलकी वाहने कामगार चौकातून डावीकडे वळून एफडीसी कॉर्नर, रांजणगाव, एनआरबी चौक, साजापूरमधून पुढे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे मार्गे पुढे जातील.

ashadhi wari
आषाढी वारी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वाळूज महानगर : प्रति पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (२५ जुलै) होणाऱ्या यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उद्या, शुक्रवारी रात्री आठपासून शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत काही मार्ग सर्व वाहनांसाठी, तर काही मार्ग जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

प्रति पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात आषाढी एकादशीनिमित्त दीडशे ते दोनशे लहान-मोठ्या दिंड्या दाखल होतात; तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूंना यात्रेनिमित्त विविध साहित्यांची दुकाने थाटली जातात. भाविकांची गर्दी, वाहनांची वर्दळ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील प्रति पंढरपूर येथे शनिवारी २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात दीडशे ते दोनशे लहान मोठ्या दिंड्या मार्गक्रमण करुन येतात.

Maharashtra TimesDivija Fadnavis : सोशल मीडिया ट्रेण्डचं आंधळं समर्थन करु नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीची CJP आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया
या महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी रात्री आठपासून शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. यासाठी पुढीलप्रमाणे पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एएस क्लब चौक ते कामगार चौकपर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील, तिरंगा चौक (ओयासिस) ते आंबेडकर चौक (एफडीसी कॉर्नर) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. इसारवाडी फाटा ते कामगार चौकपर्यंतचा रस्ता हा सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद राहील, नगरनाका ते एएस क्लब चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद राहील. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जालना, बीडकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी जड वाहने महानुभव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा ते अहिल्यानगर; तसेच पुणे जातील व येतील.

जालना, बीडकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी हलकी वाहने महानुभव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव, बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा ते अहिल्यानगर, पुणे जातील व येतील. धुळेकडून अहिल्यानगर, पुणेकडे जाणारी जड वाहने साजापूर फाटा, एएस क्लब पुलावरून कांचनवाडी पुलाखालून पैठण रस्त्यावरून चित्तेगाव, बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा ते अहिल्यानगर पुणे जातील व येतील. जालना, बीड, जळगावकडून धुळे, नाशिककडे जाणारी हलकी व जड वाहने लिंकरोड किंवा वाल्मी नाका येथून नवीन सोलापूर-धुळे महामार्गाने जातील व येतील. छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी हलकी वाहने नगरनाका, एएस क्लब चौक, तिसगाव चौफुली, साजापूरगावातून एनआरबी चौक, रांजणगाव, एफडीसी कॉर्नर, कामगार चौक मार्गे पुढे जातील व येतील. छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने नगरनाका, पडेगाव, मिटमिटा, तिसगाव चौफुली किंवा साजापुर गावातुन एनआरबी चौक, रांजणगाव, एफडीसी कॉर्नर, कामगार चौक मार्गे पुढे जातील. पुणे अहिल्यानगरकडून जालना, बीड, नाशिक, धुळे, जळगावकडे जाणारी अवजड वाहने इसारवाडी फाटा येथून बिडकीन, वाल्मी नाका, कांचनवाडी मार्गे राष्ट्रीय महामार्ग ७५२६ वरून पुढे जातील.

Maharashtra TimesCrime News : ‘तुम्ही ‘वेलकम हॉटेल’ला या’; विभक्त राहणारा नवरा बायकोला भेटायला गेला, हॉटेलच्या रुममध्ये संतापजनक कृत्य
पुणे अहिल्यानगरकडून शहकडे येणारी हलकी वाहने पाटोदा, संताजी चौक, वाल्मी नाका, महानुभव चौक मार्गे पुढे जातील. वाळूज एमआयडीसीकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारे जड वाहने साजापुर फाटा, एएस क्लब पुलावरून कांचनवाडी पुलाखालून पठाण रस्त्यावरून चित्तेगाव, बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा अहिल्यानगर पुणे जातील व येतील. छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी एसटी महामंडळाची सर्व बसेस व खासगी ट्रॅव्हल्स महानुभव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव-बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा येथून जातील.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा