दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमधील त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दरवर्षी अजित पवारांच्या वाढदिवसाला आम्ही सर्व एकत्र यायचो, मात्र यंदा दादांना भेटता येत नसल्याने ही पोकळी सहन होत नाही. दादांच्या जाण्याने बारामती पोरकी झाली आहे,” अशा अत्यंत भावूक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.