Tilak Varma News : भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याने पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यावर स्लो खेळण्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. पहिल्या बॉलपासूनही मोठे हिट मारण्याची क्षमता माझ्यात आहे असं सांगताना त्याने स्लो खेळण्याचं कारण सांगितलं आहे. ी
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेला उद्यापासून म्हणजेच २३ जुलैला सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याला धीम्या गतीने खेळण्यावरून त्याला प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना तिलकने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी पहिल्या चेंडूपासून हिट मारू शकतो पण प्रत्येक सामन्यात गतीने धावा करण्याची आवश्यकता नसते, सामन्याच्या परस्थितीनुसार खेळत असल्याचं तिलक म्हणाला.
तिलक वर्मा काय म्हणाला?
टी-२० क्रिकेट सामन्यात प्रत्येकवेळी वेगळी परिस्थिती असते आणि त्यानुसार प्रत्येक फलंदाज जुळवून घेत खेळतो. आयर्लंड दौऱ्यामध्ये पॉवर प्ले किंवा पहिल्या १० ओव्हरमध्येच भारताच्या चार ते पाच विकेट जात होत्या. त्यामुळे संघ अडचणीत असताना वेगाने धावा करण्यासाठी धोका पत्करू शकत नाही. जर गरज असेल तर मी पहिल्या चेंडूपासूनच मोठे हिट खेळू शकतो, पण देशासाठी खेळताना तेही उपकर्णधारपदाची जबाबदारी असताना डाव सांभाळणं गरजेचं असतं. अशावेळी उगाच स्ट्राईक रेट वाढवण्याच्या नादात आऊट होणं हा चुकीचा निर्णय ठरू शकतो, असं तिलक वर्मा म्हणाला. R Ashwin : रोहित शर्मा आणि विराट कोहलीला कोणी टचही करू शकत नाही; आर अश्विन असं का म्हणाला? टीम मॅनेजमेंट ज्या भूमिकेसाठी मला पाठवतं त्याप्रमाणे मी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिलक वर्माने म्हटलं आहे. आता झालेल्या आयर्लंड आणि इंग्लंडमधील मालिकेत झालेल्या सात टी-२० सामन्यात तिल वर्मा याने १७८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यामधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ५५ असून स्लो खेळल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. आता झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेमध्ये कशा प्रकारे खेळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. IND vs PAK: भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम? दरम्यान, श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने एकही टी-२० सामना जिंकलेला नाही. आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने २-० ने तर इंग्लंडने ४-० ने मात करत भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे या मालिकेत तरी भारतीय संघ विजयाचा श्रीगणेशा करतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. Rohit Sharma : इंग्लंडला रोहित शर्मा फोडत होता, पण बॅट टीमबाहेर असलेल्या खेळाडूची होती; नेमकी कोणाची?
भारत वि. झिम्बाब्वे टी-२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना- २३ जुलै, दुपारी ४.३० वाजता
दुसरा टी-२० सामना- २४ जुलै, दुपारी ४.३० वाजता
तिसरा टी-२० सामना- २५ जुलै, दुपारी ४.३० वाजता
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा