CJP Protest : दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू असून या आंदोलनात चिन्मयी सुमीत मुलांसह सहभागी झाली आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसेसुद्धा दिल्लीमध्ये आंदोलनासाठी पोहोचले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरूच आहे. आज, २० जुलै रोजी, सीजेपी संसदेपर्यंत मोर्चा काढणार आहे. सीजेपीच्या आंदोलनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळत आहे. नीट परीक्षेतील अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल शबाना आझमी दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहोचल्या. त्यांनी उपोषणावर बसलेल्या कॉकरोच जनता पक्षाचा संस्थापक अभिजीत दीपकेची भेट घेतली आणि पीडित विद्यार्थ्यांना जबाबदारी व न्याय मिळावा अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांशीही संवाद साधला. अशातच आता मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसोबत या आंदोलनाला पोहोचले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
CJP Protest मध्ये Jantar Mantar ते Sansad Bhawan लाखोंची गर्दी, Modi Government ला जड जाणार
सुमीत राघवनचा मुलगा नीरद सुमीतनं सोशल मीडियावर कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री चिन्मयी सुमीतसुद्धा मुलांसोबत या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. त्याचबरोबर मराठी दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसेसुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अभिजित यांनी आंदोलनातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिजित पानसे यांचा व्हिडिओ
हा व्हिडिओ शेअर करत अभिजित म्हणतायत की, ‘संसदेवर जो मोर्चा चालला आहे, त्या मोर्चाला मनसेचा आणि राज ठाकरे यांचा पाठिंबा आहे. प्रचंड मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ दिल्लीत या आंदोलनात सहभागी झालो आहे. या आंदोलनादरम्यान लाठीमार करण्यात आला आणि अनेक तरुण जखमी झाले. हा आक्रोश एका गोष्टीसाठी आहे. बघू पुढे काय होतंय.’
दरम्यान, सीजेपी ६ जूनपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. नीट-यूजी परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही संघटना करत आहे. सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आणि उपोषण सुरू केलं. २२ दिवसांच्या उपोषणानंतर शनिवारी सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर, सीजेपीनं रविवारी ‘चलो संसद’ मोर्चाची घोषणा केली.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा