Headlines

काय सांगता! भारताविरूद्ध इंग्लंडचा एक खेळाडू तिन्ही सामन्यात NOT OUT; नेमका कोण?


IND vs ENG ODI Series News : भारत आणि इंग्लंडमध्ये वनडे मालिका पार पडलाी. भारताला २-१ ने मालिका गमवावी लागली, याचं मुख्य कारण म्हणजे इंग्लंडचा एक खेळाडू सलग तीन सामन्यात नाबाद राहिलाय, नेमका कोण आहे तो इंग्लंडचा तारणहार आणि भारतासाठी हिरो जाणून घ्या.

Rohit sharma
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : निष्प्रभ गोलंदाजीचा फटका भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्याच्या समारोपाच्या लढतीतही बसला. रविवारी लॉर्ड्सवरील लढतीत इंग्लंडकडून २७ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारताने वनडे क्रिकेट मालिका १-२ अशी गमावली. रोहित शर्माने (१३८) शतकी खेळी करत आपल्या वनडे कारकिर्दीला संजीवनी दिली, तर शुभमन गिल (७७) आणि विराट कोहली (७४) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र इंग्लंडचे ३८८ धावांचे आव्हान भारताला झेपले नाही. टीम इंडियाचा डाव ७ बाद ३६० धावांत संपुष्टात आला. इंग्लंडचा एक असा खेळाडू ज्याला भारतीय गोलंदाज तिन्ही सामन्यात आऊट करू शकले नाहीत. कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या.

या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेमध्ये इंग्लंडचा खेळाडू जो रूट हा सर्वाधिक २४९ धावा करणारा खेळाडू ठरला आहे. भारतीय गोलंदाज त्याला एकाही सामन्यामध्ये आऊट करू शकले नाहीत. पहिल्या वनडेमध्ये ७६ चेंडूत नाबाद ७६ धावा, दुसऱ्या वनडेमध्ये १३३ चेंडूत नाबाद ९९ धावा आणि तिसऱ्यातही ४८ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या होत्या. या मालिकेत जो रूट हा एकमेव खेळाडू आहे ज्याला एकाही भारतीय गोलंदाजाला आऊट करता आले नाही. मालिकावीर म्हणून रूटला गौरवण्यात आलं.
Maharashtra TimesRohit Sharma : हिटमॅनची 138 धावांची तुफान खेळी; ‘शेवटचा वनडे’ सामन्याच्या चर्चांवरुन प्रश्न, गिल म्हणतो, रोहित भाई काहीच बोलला नाही
तिसरा वनडे सामना सर्वांच्या आठवणीत राहणारा असेल. कारण इंग्लंडने भारताविरूद्ध ३८७-३ धावा केल्या होत्या. यामध्ये बेन डकेटने सर्वाधिक १४१ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्माने त्याचा क्लास दाखवत १३८ धावांची तुफानी शतकी खेळी करत भारताला सामन्यात ठेवले होते. मात्र त्याच्या विकेटनंतर भारताचा डावही सावरू शकसले नाहीत.
Maharashtra TimesFIFA World Cup Winner 2026 : विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर

इंग्लंडच्या विक्रमी धावा

इंग्लंडने लॉर्ड्स स्टेडियमवरील वनडेमधील आपली सर्वोच्च धावसंख्या केली. यापूर्वी त्यांची या मैदानावरील सर्वोत्तम धावसंख्या ३३४ होती. १९७५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ही धावसंख्या उभारली होती. याच सामन्यांत सुनील गावस्कर यांनी १७४ चेंडूंत ३६ धावांची नाबाद खेळी केली होती.

  • १ लॉईसवर रोहितने प्रथमच शतक झळकावले
  • ३४ रोहित शर्माच्या वनडेतील शतकांची संख्या
  • ८ रोहित शर्माची इंग्लंडविरुद्धची शतके
  • ४०० रोहित आणि विराट यांनी एकत्र आंतरराष्ट्रीय सामन्यांत भाग घेण्याची खेप. या यादीत कुमार संगकारा, महेला जवर्धने (५५०) अव्वल, तर तिलकरत्ने दिलशान-महेला जयवर्धने (४२६) दुसऱ्या स्थानी.