Biggest Airlines Downfall: फरार उद्योगपती विजय मल्ल्याने 2005 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स सुरू केलेली जी एकेकाळी भारतातील सर्वात स्वस्त विमान कंपन्यांपैकी होती. मात्र विजय मल्ल्या यांच्या उधळपट्टी, गैरव्यवस्थापन आणि वाढत्या कर्जामुळे 2012 मध्ये कोसळली.

A law firm wants to leave Vijay Mallya’s two-decade-old case. They have not communicated with their client for many years.
किंगफिशर एअरलाइन्स विजय मल्ल्या यांच्या मालकीची आणि त्यांच्या कोट्यवधी साम्राज्याचा गौराज मानली जायची. पण एकेकाळी भारतातील सर्वात स्वस्त विमान कंपनी मानल्या जाणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्सचा मल्ल्या यांच्या उधळपट्टी आणि गैरव्यवस्थापनामुळे अवघ्या 7 वर्षांतच शेवट झाला. 2005 मध्ये विजय मल्ल्याने सुरू केलेल्या या विमान कंपनीचा उद्देश प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सेवा प्रदान करून देण्याचा होता, पण आश्वासक सुरुवात होऊनही किंगफिशर एअरलाइन्सला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यामुळे 2012 मध्ये किंगफिशर ग्राऊंडेड झाले.
विजय मल्ल्या बनले ‘किंग ऑफ बॅड टाइम्स’
भारतीय बँकांकडून कर्ज घेऊन भारतातून पसार झालेले मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकले आहेत. मल्ल्या यांच्यावर बँकेचे अंदाजे 9000 कोटींचे कर्ज असून त्यांनी सरकार आणि बँकांकडून यापेक्षा जास्त किंमत वसूल केल्याचा अनेकदा दावा केला. एकेकाळी भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिकांपैकी विजय मल्ल्या यांच्या साम्राज्याचा शेवट एखाद्या चित्रपटासारखा आहे. मल्ल्या यांचा सिनेसृष्टीपासून ते कॉर्पोरेट लॉबी आणि अगदी क्रीडा जगतावरही प्रभाव होता. मग ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ म्हणून प्रख्यात विजय मल्ल्या यांना कोणती चूक नडली?
2007 मधील एक चूक नडली
विजय मल्ल्याने 2005 मध्ये किंगफिशर एअरलाईन्स सुरू केलेली आणि या कंपनीला देशातील मोठा ब्रँड बनवण्याचा त्यांचा उद्देश होता. म्हणूनच मल्ल्याने 2007 मध्ये देशातील पहिली कमी खर्चाची एअरलाइनचा, एअर डेक्कन, तब्बल 300 दशलक्ष डॉलर्स (2007 मध्ये अंदाजे 1200 कोटी रुपये) खर्च करून ताबा घेतला, जी मल्ल्याची सर्वात मोठी चूक ठरली. या करारानंतर 5 वर्षांतच मल्ल्यांची किंगफिशर एअरलाइन्स कोसळली आणि त्यांचे संपूर्ण व्यावसायिक साम्राज्य अक्षरशः नष्ट झाले.
किंगफिशर बनली दुसरी मोठी एअरलाईन
या खरेदी करारामुळे मल्ल्याला तात्काळ फायदा झाला आणि 2011 मध्ये किंगफिशर देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी बनली. पण, एअर डेक्कनचे अधिग्रहण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात कंपनी अयशस्वी ठरली आणि वाढत्या इंधन खर्चामुळे परिचालन खर्च वाढला, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.
विजय मल्ल्याच्या घाईमुळे डाव फसला?
विजय मल्ल्याला किंगफिशरद्वारे शक्य तितक्या लवकर उंचच उंच यशाचे शिखर चढायचे होते. पण राष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही विमान कंपनीला 5 वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापासून मनाई आहे. यादरम्यान, मल्ल्याने एअर डेक्कनचे अधिग्रहण करून हा नियम टाळण्याचा प्रयत्न केला, जी त्यांची मोठी धोरणात्मक चूक ठरली परिणामी किंगफिशर मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकली.
किंगफिशरला लागलं टाळ
त्यानंतर मल्ल्याने आणखी एक चुकीचा निर्णय घेतला. मल्ल्या एअर डेक्कनला दत्तक मुलाप्रमाणे वागवत होते आणि मर्जरनंतर एअर डेक्कनचे ग्राहक किंगफिशरकडे वळतील अशी मल्ल्यांना आशा होती, पण नेमकं त्याउलट घडलं. अखेरीस एअर डेक्कनचे – किंगफिशर रेडचे _ ग्राहक इतर कमी खर्चिक विमान कंपन्यांकडे वळू लागले. त्यामुळे ऑक्टोबर 2012 मध्ये किंगफिशर एअरलाइन्सला टाळं लागलं, ज्याचा परिणाम मल्ल्यांच्या व्यावसायिक साम्राज्यावर झाला.
मल्ल्याची परिस्थिती इतकी बिकट का झाली?
विजय मल्ल्याला वडील विठ्ठल मल्ल्या यांच्याकडून मद्य व्यवसायाचा वारसा मिळालेला आणि देशातील नामांकित व्यवस्थापन संस्थांमधून लोकांना भरती केले आणि मद्य उद्योगाला कॉर्पोरेट स्वरूप दिले. मात्र, क्षणात नवीन कंपन्या विकत घेण्याच्या आणि अनेकदा हिशोब न पाहता निर्णय घेण्याच्या सवयीमुळेच मल्ल्याचा ‘रावाचा रंक’ झाला. मल्ल्याने दारूचा बादशाह म्हणून नव्हे तर ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ उद्योजक म्हणून ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने किंगफिशर एअरलाइन्सची सुरुवात केलेली. म्हणूनच त्यांना आपल्या एअरलाइनमधील प्रवाशांना अशा सर्व सोयीसुविधा द्यायच्या होत्या, ज्याचा विचार इतर कोणत्याही कंपनीने केला नव्हता.
नफ्यावर नकारात्मक परिणाम
मल्ल्याने आपल्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महागडी परदेशी वृत्तपत्रे आणि मासिके मागवली, जी बहुधा गोदामातून बाहेरच पडली नाही. याचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या नफ्यावर होणे साहजिक होते, पण यामुळे वारंवार कर्ज घेणारा मल्ल्या इतका कर्जबाजारी झाला की, कर्जाची परतफेडही करू शकला नाही आणि देशातून पळ काढला.

