Headlines

फिफा वर्ल्ड कप फायनलचा आज रात्री थरार, किती वाजता सुरू होणार? स्पेनकडून अर्जेंटिनाला धोका, शेवटच्या मॅचमधील आकडेवारी


FIFA World Cup Final 2026 News : आक्रमक बाणा, अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती आणि लिओनेल मेस्सीसारखा जागतिक कीर्तीचा शिलेदार यामुळे समृद्ध असलेला अर्जेंटिना आणि भक्कम बचाव… हुशारी… संयम अशा त्रिसूत्रीसह खेळणारा स्पेन संघ आज, रविवारी रंगणाऱ्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. प्रतिस्पध्र्थ्यांचे गुणकौशल्य बघता न्यूयॉर्क/न्यूजर्सी स्टेडियमवरील ही लढत फुटबॉलप्रेमींसाठी सर्वोत्तम फुटबॉलची पर्वणी असणार आहे. या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यात कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे.

FIFA World Cup Final 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : विजेतेपदासाठी फेव्हरिट समजल्या जाणाऱ्या फ्रान्सला उपांत्य फेरीत २-० असे गुंडाळून स्पेनने अंतिम फेरीत धडक मारली. या विजयात मिकेल ओयार्झाबाल आणि पेद्रो पोरो यांनी गोल केले. गेल्या १७ सामन्यांत हा संघ अपराजित आहेत. लामिन यमाल याचा बोलबाला असला, तरी स्पेनकडून ओयाझांबाल यानेही लक्ष वेधून घेतले आहे. त्याने स्पेनसाठी सर्वाधिक पाच गोल केले आहेत. ओयाझांबाल याचे काही गोल तर स्पेनच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारेही ठरले आहेत.

फुटबॉल फायनल सामना

अर्जेटिना वि. स्पेन हा सामना आज मध्यरात्री १२.३० पासून सुरू होणार आहे. न्यूयॉर्क/न्यूजर्सी स्टेडियम येथे हा सामना पार पडणार असून दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांवर प्रत्येकी सहा विजय. तर दोन लढतींत बरोबरी साधली आहे. वर्ल्ड कपची आकडेवारी पाहिली तर एकमेव लढतीत अर्जेंटिनाचा २-१ असा विजय (१९६६).
Maharashtra TimesFIFA WC Final : अमेरिकेत नेमकं काय झालंय? अनेक राज्यांमध्ये धूरच धूर, FIFA वर्ल्ड कप फायनल मॅचवर परिणाम होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
स्पेनने गेल्या सहा लढती जिंकताना १३ गोल केले असून, अवघा एक गोल स्वीकारला आहे; तसेच सर्व सहा सामन्यांत पहिला गोल स्पेननेच केला आहे. स्पेनचे बहुतेक गोल (सात) पहिल्या सत्रात झाले आहे. स्पेनच्या प्रतिस्पध्र्थ्यांमध्ये एकाच संघाला पहिल्या ४५ मिनिटांत गोल करता आला आहे, यावरून त्यांच्या बचावफळीची ताकद अधोरेखित होते. अर्जेंटिनाची बाजू संपूर्ण स्पर्धेत अर्जेंटिनाने प्रतिस्पध्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. मेस्सी आणि कंपनीने उपांत्य सामन्यात इंग्लंडवर २-१ अशी सरशी साधून अंतिम फेरी निश्चित केली.
Maharashtra TimesFIFA WC 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार स्पेशल ‘चॅम्पियनशिप रिंग’, चाहत्यांनाही तब्बल 1996 रिंग्स भेटणार, जाणून घ्या
अर्जेटिनाने सलग १४ सामने जिंकले आहेत. या संघाचा हुकुमी एक्का असणाऱ्या मेस्सीने यंदाच्या स्पर्धेत त्याने आठ गोल केले आहेत. यात आज किती गोलची भर टाकतो, यावरही साऱ्यांचे लक्ष असेल. अर्जेटिनाने आपले मागील प्रत्येक सहा सामने जिंकले आहेत. अर्जेंटिनाने या कालावधीत १६ गोल केले असून, सात गोल स्वीकारले आहेत; तसेच सहापैकी चार सामन्यांत पहिला गोलही अर्जेंटिनाचाच आहे. त्यांनी पहिल्या सत्रात पाच गोल केले, तर त्यांच्या प्रतिस्पध्यांनी मध्यंतरापूर्वी केवळ एकदाच गोल केला आहे.
Maharashtra TimesFIFA World Cup 2026 : फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरसाठी आज इंग्लंड-फ्रान्समध्ये लढत, 279 कोटीचं बक्षीस कोण जिंकणार?

प्रतिस्पर्ध्यांमध्ये गेल्या लढतीत काय…

प्रतिस्पर्ध्यांची यापूर्वीची लढत मार्च २०१८ मध्ये रियाध येथे झाली होती. त्या वेळी स्पेनने अर्जेंटिनावर ६-१ अशी सरशी साधली होती. इस्कोने २७, ५२ आणि ७४व्या मिनिटाला गोल करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिएगो कोस्ता, थियागो अल्कांतारा आणि इयागो अस्पास यांनीही गोल केले. निकोलास ओतामेंदी याने ३९व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी गोल केला.

लक्षवेधक…

  • वर्ल्ड कप अंतिम फेरीत धडक मारण्याची अर्जेंटिनाची ही सातवी खेप. त्यांच्यापुढे केवळ जर्मनी (८).
  • स्पेन दुसऱ्यांदा वर्ल्ड कप अंतिम फेरीत. यापूर्वी, स्पेनने २०१०मध्ये विजेतेपद पटकावले होते. सहा प्रमुख स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारताना स्पेनने पाच वेळा जेतेपद पटकावले आहे.
  • अर्जेंटिनाने यंदाच्या वर्ल्ड कपमधील आपले सातही सामने जिंकले आहेत. याआधी अशी कामगिरी २००२मध्ये ब्राझीलने केली होती. ब्राझील विजेता ठरला होता. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची अर्जेंटिनाला संधी.
  • मार्च २०२४ मध्ये कोलंबियाकडून ०-१ अशा पराभवानंतर सर्व स्पर्धांमध्ये स्पेन ३७ सामन्यांत अपराजित. आजही पराभव टाळल्यास एवढा दीर्घ काळ अपराजित राहणारा स्पेन पहिला यूरोपीय संघ ठरेल.

खेळ आकड्यांचा

  • वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रथमच विद्यमान कोपा अमेरिका आणि युरो विजेते आमनेसामने. या स्पर्धेतील कोणत्याही सामन्यात क्रमवारीतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ प्रथमच एकत्र
  • वर्ल्ड कप अंतिम फेरीत हा सहावा गतविजेता. ब्राझील (१९६२) आणि इटली (१९३८) यांनी जेतेपद राखले होते. तर अर्जेटिना (१९९०), ब्राझील (१९९८) आणि फ्रान्स (२०२२) यांना अपयश आले होते.
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा