Headlines

Pune NCP Parth Pawar Municipal Corporation Former Corporator Review Meeting; पुण्याच्या मैदानात जय पवारांची ‘पॉवरफुल’ एन्ट्री! भाजपच्या दादागिरीविरोधात नगरसेवक आक्रमक; जय पवारांच्या बैठकीची इन्साईड स्टोरी


Pune Marathi News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी आज-माजी लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली आहे.

Pune Marathi News
राष्ट्रवादी पार्थ पवार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानंतर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ आणि संभ्रमावस्था संपवण्यासाठी आता त्यांचे सुपुत्र जय पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. दोन्ही महापालिकांमधील आजी-माजी लोकप्रतिनिधींची (नगरसेवक आणि नगरसेविका) त्यांनी एक तातडीची आढावा बैठक घेतली. या नव्या घडामोडीमुळे आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व अधिकृतपणे जय पवार यांच्या हातात जाणार का, याविषयीच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विकासकामे आणि संघटनात्मक बांधणीवर भर

जय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि स्थानिक विकासकामांवर विस्तृत चर्चा झाली. जय पवार यांनी प्रत्येक प्रभागातील कामांचा सद्यस्थितीचा अहवाल घेत, नागरिकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी त्यांनी थेट आजी माजी नगरसेवकांशी संवाद साधत आगामी काळातील रणनीतीवर आवश्यक त्या सूचना दिल्या.
Maharashtra TimesPune News: पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार

स्थानिक पातळीवरील अस्वस्थता

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील राष्ट्रवादीच्या गोटात तीव्र नाराजी पसरली होती. स्थानिक पातळीवरील आपल्या अडचणी आणि व्यथा नेमक्या कोणाकडे मांडायच्या, याबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता नव्हती. त्यातच, राज्यात जरी भाजपसोबत युती असली, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांशी कसे जुळवून घ्यायचे, याबाबत पक्षात कमालीचा संभ्रम होता. पक्षाच्या अस्तित्वासाठी स्थानिक पातळीवर लढा द्यायचा की मवाळ भूमिका घ्यायची, यावरून स्थानिक नेतृत्व द्विधा मनःस्थितीत होते.

पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी?

यापूर्वी खासदार पार्थ पवार हे पुण्यातील राजकीय घडामोडींमध्ये लक्ष घालत होते. मात्र, त्यांच्या काही धरसोडीच्या निर्णयांमुळे स्थानिक राष्ट्रवादीला भाजपच्या धोरणांसोबत फरफटत जावे लागल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. महापालिकेत आधी भाजपच्या निर्णयांना विरोध करायचा आणि नंतर वरिष्ठ पातळीवरून आलेल्या फोनमुळे त्याच निर्णयांना पाठिंबा द्यायचा, या दुटप्पी भूमिकेचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांनी मध्यस्थी करावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत असतानाच, जय पवार यांनी थेट पुढाकार घेत ही बैठक बोलावली.
Maharashtra TimesDharashiv News : भात वाढल्यानंतर चक्क अळ्या, FDAला कळताच शाळेत अधिकारी धडाधड पोहोचले; जि.प.शाळेतील संतापजनक प्रकार

भाजपविरोधात नगरसेवकांचा संताप; जय पवारांचे आश्वासन

या बैठकीत काही आजी माजी नगरसेवकांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. “वरिष्ठ पातळीवर सत्तेत एकत्र असलो, तरी महापालिकेत भाजपचे नेते आपल्याला कवडीचीही किंमत देत नाहीत, उलट राष्ट्रवादीच्या प्रभागांमधील विकासकामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जातात,” असा थेट आरोप लोकप्रतिनिधींनी केला. जेव्हा भाजपला स्वतःचे ठराव मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मतांची गरज असते, तेव्हा ते वरिष्ठांमार्फत दबाव आणून पाठिंबा घेतात, मात्र राष्ट्रवादीला गरज असते तेव्हा सहकार्याची भूमिका घेत नाहीत, असा संताप नगरसेवकांनी व्यक्त केला. यावर जय पवार यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, यावर लवकरच वरिष्ठ पातळीवर बोलून सकारात्मक आणि ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमुळे पुण्याच्या राजकारणात आता अजितदादांच्या राजकीय वारसाची नवी इनिंग सुरू झाल्याचे मानले जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा