Headlines

5 मिनिटांत मागच्या 3 वर्षांचे IT रिटर्न डाऊनलोड करा, तुमच्या CA ला फोन लावण्याची गरज नाही। Maharashtra Times


बँक लोन, व्हिसा किंवा इतर आर्थिक कामांसाठी अनेकदा मागच्या 3 वर्षांच्या आयटी रिटर्न (ITR) कागदपत्रांची गरज भासते. आता यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून पॅन कार्ड आणि पासवर्डच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटांत तुमचे जुने ITR हे ऑनलाइन डाऊनलोड करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

ITR 2026। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
कर्ज घेण्यासाठी मागच्या 3 वर्षांच्या आयटी रिटर्न (ITR) कागदपत्रांची गरज भासते. हे रिटर्न मागवण्यासाठी तुम्हाला तुमच्या CA ला फोन करण्याची गरज नाही. घरी बसून जुने उत्पन्नाचे पुरावे मिळवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरून नोकरदार आणि व्यावसायिक करदाते त्यांचा मागील 3 वर्षांचा ITR फॉर्म आणि पावती सहज डाऊनलोड करू शकतात. सुरक्षिततेसाठी पॅन कार्ड नंबरसोबतच खात्याचा पासवर्ड आणि नोंदणीकृत मोबाईलवर येणारा OTP असणे आवश्यक आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

आता आयकर विभागाच्या ऑनलाइन पोर्टलमुळे करदात्यांना केवळ 5 मिनिटांत त्यांचे जुने IT रिटर्न डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी मुख्यत्वे पॅन कार्ड नंबर आणि खात्याचा पासवर्ड आवश्यक असतो.

आयकर विभागाच्या ई-फायलिंग प्रणालीचा वापर करून जुने रिटर्न डाऊनलोड करण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा वापर हा करावा.

ITR डाऊनलोड करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

  • पोर्टलला भेट द्या: सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत Income Tax Department Portal वर जा.
  • लॉगिन करा: होमपेजवर ‘Login’ बटणावर क्लिक करून ‘User ID’ म्हणून आपला पॅन नंबर टाका आणि पासवर्ड भरून खात्यात प्रवेश करा.
  • पर्याय निवडा: डॅशबोर्ड उघडल्यानंतर मुख्य मेनू मधील ‘e-File’ -> ‘Income Tax Returns’ -> ‘ View Filed Returns ‘ या पर्यायावर क्लिक करा.
  • वर्ष निवडा: या स्क्रीनवर तुम्ही मागच्या वर्षांत फाईल केलेले सर्व आयटीआररेकॉर्ड्स दिसतील. तुम्हाला ज्या वर्षाचा डेटा हवा आहे, ते ‘Assessment Year’ (कर आकारणी वर्ष) निवडा.
  • डाऊनलोड करा: फॉर्म पूर्ण डाऊनलोड करण्यासाठी ‘Download Form’ वर क्लिक करा आणि पावतीसाठी ‘Download Receipt’ (ITR-V) वर क्लिक करा. (REF.)

डेटा सुरक्षेसाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

इंटरनेटवर अनेक बनावट लिंक्स आणि ॲप्स उपलब्ध आहेत जे “फक्त पॅन कार्ड टाका आणि ITR मिळवा” असा दावा करतात. अशा फसव्या दाव्यांपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. पॅन कार्ड हा वैयक्तिक डेटा असल्याने, अधिकृत वेबसाइटवर लॉगिन केल्याशिवाय आणि OTP पडताळणीशिवाय कोणालाही तुमचा ITR डाऊनलोड करता येत नाही. डाऊनलोड केलेली PDF फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड असते, जी उघडण्यासाठी तुमचा पॅन नंबर (स्मॉल लेटर्समध्ये) आणि तुमची जन्मतारीख (DDMMYYYY फॉर्मेट) एकत्र टाकावी लागते.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा