Jantar Mantar CJP Protest: आक्रोश आणि दडपशाही – delhi police lathi-charge on neet protesters at jantar mantar
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) गैरप्रकारांच्या विरोधातातील विद्यार्थ्यांच्या मोर्चावरील लाठीमाराची दृश्ये पाहून कोट्यवधी घरांतील विद्यार्थी आणि त्यांचे आई-बाप नक्कीच कळवळले असतील. राजधानी दिल्लीने आजवर शेकडो आंदोलने-मोर्चे-निदर्शने पाहिली आहेत; मात्र पारदर्शक परीक्षापद्धतीच्या साध्या मागणीसाठी आक्रोश करणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींना अशा पद्धतीने काठ्यांच्या फटक्यांनी जायबंदी करण्यातून व्यवस्थेच्या अमानवी चेहेऱ्याचे दर्शन घडले, एवढे मात्र खरे. दुसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते…
