Headlines

शिवसेनेच्या वतीने तलाठी गौरव दळवी यांचा सन्मान


मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुली वर्ष 2025-26 दरम्यान शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत महसूल प्रशासनाची प्रतिमा उंचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मालवण शहराचे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी गौरव दळवी यांचा महसूल दिनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. या सत्काराच्या निमित्ताने मालवण शिवसेनेच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संदेश चव्हाण, मोहन वराडकर, राजू बिडये, मयू पाटकर, बाबू धुरी, महेश सारंग, संदीप मालंडकर, श्री. मयेकर व इतर उपस्थित होते. तसेच यावेळी मंडळ अधिकारी पीटर लोबो हे उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत