Headlines

वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर तरी प्रकृतीत सुधारणा नाही – valmik karad contracted the disease urosystasis; his condition worsened and he was admitted to hospital



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती खालावली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती अचानक ढासळल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती सातत्याने बिघडत चालली आहेवाल्मिक कराडची तब्येत बिघडल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याची शारीरिक स्थिती कमकुवत झाल्यामुळे त्याला सध्या सलाईन लावण्यात आले आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या विशेष पथकाने कारागृहात जाऊन तसेच रुग्णालयात त्याची सखोल वैद्यकीय तपासणी केली आहे. मात्र, योग्य उपचारांनंतरही त्याच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा होत नसून उलट ती अधिकच ढासळत चालल्याचे समजते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत